Ajit Pawar 
सातारा

Ajit Pawar : अजितदादांची मनधरणी करण्यासाठी भाजप नेते संपर्कात? दादा पुन्हा रुसले? थेट पत्रकार परिषद घेतली अन्...

Sandip Kapde

Ajit Pawar :   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे पाऊल उचलत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. पक्षाच्या 25 व्या स्थापना दिनाच्या समारंभात दिल्लीत पवारांनी ही घोषणा केली. पुतण्या अजित पवार यांच्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर आज साताऱ्यात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, मी नाराज नाही. मला केंद्रातील राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्यातील विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी आहे.

देवेंद्र फडणवीस शरद पवारांचा निर्णय म्हणजे धूळफेक असल्याचे म्हटले होते. यावर अजित पवार म्हणाले, हा आमचा पक्षाअंतर्गत प्रश्न आहे. भाकरी फिरवली हे माध्यमांनी सांगितले. शरद पवार यांनी स्वत: अस काही सांगितले नाही. फडणवीसांनी काय म्हणाव हा त्यांचा अधिकार आहे.

भाजप नेते संपर्कात असल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, माझ्या संपर्कात कोणी नाही. कोणी काम घेऊन आलं तर मी काम करतो. अडीच वर्ष उपमुख्यमंत्री असताना मी पक्षीय अँगलमधून बघायचो नाही. मी कोणतेही काम करत होतो. आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर टीका करायचे पण ते चांगले मित्र देखील होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik: काँग्रेसच्या रॅलीतील महिलांचे फोटो काढा, त्यांची व्यवस्था करू, धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींना दमदाटी!

Mahayuti: ओबीसी एकीकरणावर भाजपचा भर तर मुख्यमंत्र्यांची मराठा समाजाला साद, काय आहे महायुतीचा प्लॅन?

Latest Marathi News Updates : पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सवलत

Sakal Podcast: अमेरिकेत नोकरीचं स्वप्नं पूर्ण होणार का? ते राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता

Railway: रेल्वेत फुकट्या जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई करा; प्रवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT