सातारा : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त क-हाड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळी आज राजकीय नेत्यांपासून सामान्य जनेतेपर्यंत सर्वचजण यशवंतरावांना अभिवादन करीत आहेत. केवळ कराड आणि परिसरात यशवंतरावांनी नेतृत्व केले नाही तर देशाच्या संरक्षणपदासह उपपंतप्रधानापर्यंतची जबाबदारी सांभाळात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यासाठी आणि झाल्यानंतरही खर्या अर्थाने पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. माणूस म्हणून यशवंतराव थोर होते हे आपल्याला त्यांच्या संबंधित लिहिण्यात आलेल्या विविध पुस्तकांतून समजते. कृष्णाकाठ हे यशवंतरावांचे आत्मचरित्र युवा पिढीने जरुरु वाचले पाहिजे.
राजकारण हे यशवंतरावांच्या रक्तात भिनले होते. राजकारणात चढ उतार होत असतात. हे यशवंतरावांच्या बाबतीतही घडले. त्यावेळी त्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी वेणूताई या खंबीरपणे उभे राहायाच्या. यशवंतरांवाना इंदिरा गांधी यांनी अचानक रित्या अर्थमंत्री करण्याचा निर्णय सांगितला. त्यावेळी ते थोडे चलबिचल झाले. परंतु वेणूताईंनी त्यांना सावरले. त्यांनी वेणूताईंशी चर्चा करुन मार्ग काढला. खरंतर पुर्वीच्या काळी आपल्या सहचरणीच्या कानावर गोष्ट घालून तिचे विचार जाणून घेण्याची पद्धत असयाची म्हणे त्यानूसारच यशवंतरावांच्या वैवाहिक जीवनात ती एक प्रथाच बनली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यशवंतरावंचे कौटुंबिक जीवन सुखी होते. याचे प्रमुख कारण म्हणजे पती-पत्नीमधील समजूतदारपणा हे होते. दोघांमध्ये अबोला, नाराजीसारखे सर्वसाधारण संसारात घडतात तसे प्रकार कधीही पाहायला मिळाले नाही असे राम खांडेकर यांनी त्यांच्या एका लेखात देखील नमूद केले आहे. खांडेकर लिहितात यशवंतरावांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीत वेणूताईंचा मोठा वाटा होता. अतिशयोक्ती नाही, परंतु यशवंतराव वजा वेणूताई म्हणजे शून्य असेच उभयतांचे वर्तन, स्वभाव आणि नाते होते. दिल्लीत राजकारण्यांचा.. खासकरून सत्ताधीशांचा असा संसार मी तरी पाहिलेला नाही. वेणूताईंचे वागणे-बोलणे कर्मयोग्यासारखे होते. त्यांना कसलाही मोह नव्हता.
सहकारमंत्र्यांनी धाडस दाखवावे; पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे तरी ऐकावे
विवाह झाल्यानंतर चव्हाण कुटुंबाच्या घराच्या उंबरठयावर ठेवलेले माप ओलांडून वेणूताईंनी घरात प्रवेश केला आणि लवकरच त्यात त्या समरसही झाल्या. यशवंतरावांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. परिणामी कुटुंबास हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यातच वेणूताईंचे दोन मोठे दीर गेले. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाची यशवंतराव-वेणूताईंच्या खांद्यावर पडली. ऐन तारुण्यात तुटपुंज्या उत्पन्नात मोठया कुटुंबाचा संसार वेणूताईंनी हालअपेष्टांची पर्वा न करता सुखाने व आनंदाने करण्यास प्रारंभ केला. तिकडे (मुंबईत) यशवंतरावांना काळजी पडत असे वेणूताई हे सर्व कसे सांभाळत असतील. या काळजीतून ते वेणूताईंना पत्र लिहित असतं. या पत्रात सूचनांबरोबरच आपलं कोण परकं कोण याची जाणिव ते त्यांना करुन देत. आपल्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावर कोणाकडून उधार घ्यायचं, असे ते वेणूताईंना सांगत. कोणतीही तक्रार न करता वेणूताईंनी यशवंतरावांना संसारात साथ दिली. दिल्लीत गेल्यानंतर वेणूताईचे जीवन केवळ यशवंतराव आणि तेथील शिपायांच्या बायका एवढंच होतं.
शेवटची ठेव 36 हजारांची...
य़शवंतराव 25 नोव्हेंबर 1984 रोजी. माझं त्यांच्याशी फोनवर शेवटचं बोलणं झालं 19 नोव्हेंबरला. त्यावेळी निवडणुकांचं वारं होतं. ते मला म्हणाले, ''मी 25 तारखेला पुण्याला येणार, 26 ला साताऱ्यात अर्ज भरायला जाणारेय.'' आणि अचानक त्यांच्या निधनाची वार्ता आली. वेणूताईंच्या निधनानं ते पुरते खचले होते. त्यातून ते सावरू शकले नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रात अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधानपद भूषवलेला हा माणूस. एवढी सत्तास्थानं भूषवलेल्या या माणसानं आपल्यामागं केवळ विचारधनच ठेवलं. महाराष्ट्रात कुठंही त्यांचं घर, फ्लॅट, जमीनजुमला असं काही नाही. सहकारी कारखानदारीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. मात्र, कुठल्याही कारखान्यात त्यांची भागीदारी नाही, की कुठं, कशात म्हणून मालकी नाही. त्यांना मिळणारी पेन्शन, भत्ते, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा होत. निधनानंतर त्या खात्यात केवळ 36 हजाराची शिल्लक होती. बंगल्यातील कपाटात काहीही संपत्ती मिळाली नाही, असंही पत्रकार रामभाऊ जोशी यांनी देखील त्यांच्या एका लेखात आवर्जून याच उल्लेख केला आहे.
शरद पवारांना आमदार म्हणाले, तर आमचे राजकारण संपेल
वेणूताई...
यशवंतरावांनी 'कृष्णाकाठ' या आपल्या चरित्र ग्रंथाची अर्पणपत्रिका वेणूताई यांच्या स्मृतीस अर्पण करताना पुढील भावपूर्ण शब्द वापरलेले आहेत.
''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्नी...''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.