Ashadhi Wari 2024 sakal
सातारा

Ashadhi Wari 2024 : संस्थानिकांच्या नगरीत वैष्णवांची दाटी;रांगोळीच्या पायघड्या अन् पुष्पवृष्टी

महानुभव आणि जैन धर्मीयांची दक्षिण काशी आणि संस्थानिकांची नगरी अशी ओळख असणाऱ्या फलटण नगरीत टाळमृदंगाचा गजर आणि ‘माऊली-माऊली’चा नामघोष करीत सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी मंगळवारी मुक्कामी विसावली.

विलास काटे

फलटण : महानुभव आणि जैन धर्मीयांची दक्षिण काशी आणि संस्थानिकांची नगरी अशी ओळख असणाऱ्या फलटण नगरीत टाळमृदंगाचा गजर आणि ‘माऊली-माऊली’चा नामघोष करीत सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी मंगळवारी मुक्कामी विसावली. फलटणच्या भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या अन् पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे शाही स्वागत केले.

तरडगाव येथील तळावर माऊलींच्या पादुकांची सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांनी महापूजा केली. त्यानंतर सोहळा फलटणकडे मार्गस्थ झाला. सोमवारी तरडगावात जोरदार पाऊस झाल्याने सकाळी वाहने काढताना कसरत करावी लागली. लाखो वारकरी, विक्रेते, परिसरातील भाविक सोहळ्यात चालत होते. काळजमार्गे सुरवडी आणि निंभोरे ओढा येथे विश्रांती घेतल्यानंतर वारकरी पुन्हा चालू लागले. सकाळपासून ढगाळ हवामान होते. फलटणनगरीतील भाविक पालखीच्या स्वागतासाठी निंभोरे ओढ्यापर्यंत आले होते. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. शहरात प्रवेश केल्यापासून पालखी तळापर्यंत जागोजागी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. यावेळी ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

शिंदे-जाधव यांच्यात संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी सुरवडी ते फलटण दरम्यान वारकऱ्यांसमवेत पायी वाटचाल केली. वारकऱ्यांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या योजनांबाबत चर्चा केली. खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, बाळासाहेब काशिद, रमेश कोंडेही सहभागी होते. दरम्यान, डॉ. शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांची भेट झाली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. काही काळ दोघांनी एकत्र चालण्याचा आनंदही घेतला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT