आशिष शेलार  
सातारा

'महाविकास'ला कुबड्या घेऊनच चालावे लागणार, आशिष शेलारांची टीका

प्रशांत घाडगे

सातारा : राज्यात एकमेकांच्या कुबड्या घेऊन बनविलेल्या सरकारमधील पक्ष स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत. ते येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वबळावर काय लढणार? त्यांना एकमेकांच्या कुबड्या घेऊनच चालावे लागणार, असा टोला भाजपचे BJP आमदार आशिष शेलार MLA Ashish Shelar यांनी महाविकास आघाडीला Mahavikas Aghadi लागवला. तसेच, गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना Shiv Sena, राष्ट्रवादी Nationalist Congress Party व काँग्रेस Congress Party हे तीन पक्ष स्वतंत्र लढल्यानंतर त्यांची स्थिती काय होते हे राज्यातील जनतेने दाखविल्याने राज्यात ते एकमेकांशिवाय चालू शकत नसल्याचेही शेलार यांनी सांगत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी आमदार आशिष शेलार रविवारी (ता.११) साताऱ्यात आले होते. यावेळी, त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले MLA Shivendra Raje Bhosale यांच्या सुरुची या निवासस्थानी भेट दिली. ashish shelar said, mahavikas aghadi without eachother help not walk

त्यावेळी शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढील काही महिन्यांत येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यात सत्तेत असणारे तिन्ही पक्षांना जनाधार नसल्याने त्यांनी स्वबळाची भाषा करणे हास्यास्पद आहे. याचबरोबर, अधिवेशन विधानसभेचे अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव इच्छुक आहेत. आपल्याला काय वाटते, यावर आमदार शेलार म्हणाले, अध्यक्ष कोणाला करायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची हिंमत दाखवावी. भास्कर जाधव यांचा शिवसेनेने उपयोग करून घेतलेला आहे. आता या तीनपक्षांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. अधिवेशनातील प्रकारामुळे राज्यभरात त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांचा वापर करून झाल्यावर त्यांना फार काय मिळेल, अशी परिस्थिती नाही.

कोरोना, लॉकडाऊनवरून व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या विषयी बोलताना श्री.शेलार म्हणाले, की राज्य सरकारने घाबरटपणा सोडावा. पण काळजी करणे गरजेचे आहे. जनतेनेही सहकार्य करावे. पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण वाढते लोकडाऊन पाहता जनतेने जिवंत राहायचे का नाही व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचारी वर्गासाठी राज्य शासनाकडे कोणतीही मदतीची योजना नाही. गरीब माणसांना योजना नाहीत, रोजगार करणाऱ्यांना सुविधा नाहीत. केवळ घबराट निर्माण करायची याबाबत राज्य सरकारने सर्वंकष विचार केला पाहिजे. अन्यथा जनक्षोभ होईल, असा इशारा त्यांनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नाही, याविषयी विचारले असता आमदार शेलार म्हणाले, उदयनराजे आमचे नेते आहेत. भाजप पक्षात नाराजीचा कोणता विषय नाही. नव्या मंत्र्यांची यांची यादी सर्वमान्य आहे.

त्यामुळे याविषयी मी अधिक बोलू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बंडातात्या व वारकऱ्यांवरील कारवाई विषयी विचारले असता आमदार शेलार म्हणाले, मागील वेळी वारकऱ्यांवर कारवाई झाली. त्यावेळी मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते. त्यावेळी त्यांनी वारकऱ्यांविषयी वर्षांपूर्वी वारकऱ्यांवर कारवाई होते. मुख्यमंत्री विरोधी पक्षात होते. त्यांनी त्या वेळेची शब्द काढले होते. भाजप आमदारांच्या निलंबनावर शरद पवार यांनी चूक असेल तर शिक्षा होईल, असे म्हटले आहे. यावर श्री.शेलार म्हणाले, पवार साहेबांच्या वाक्याचे आम्ही समर्थन करतो. पण चूक नसताना शिक्षा झाली, तर काय करणार पवार साहेब? तसेच चूक नसलेल्यांना शिक्षा केलीय तर काय करायचे पवार साहेब, याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्यावे. सातारा जिल्हा बँकेच्या आलेल्या ईडीच्या नोटीसी विषयी ते म्हणाले, कर नाही त्याला डर कशाला? त्यांनी आपली बाजू मांडावी. प्रत्येक गोष्टीत बचावासाठी राजकारण वेळी चौकशी आली की राजकारण करायचे मग चौकशी यंत्रणानी काम करायचे की नाही. चौकशी लागली की पक्ष पुढे करून राजकारण करून चौकशी बंद करायची असे राज्य चालवायचे का, असा प्रश्न उपस्थित करून शेलार म्हणाले, यामध्ये कोणी राजकारण आणू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT