Voter Sakal
सातारा

Satara Assembly Election 2024 : चला, मतदान करू; लोकशाहीचा हक्क बजावू

Satara Vidhan Sabha Election 2024 : मतदारांना आवाहन : राज्याला बळकट करण्यासाठी अपेक्षित उमेदवार निवडण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा

-स्वराली बिडवे

सातारा : निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा उत्सव आहे. मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा सन्मान करण्याचा दिवस. विधानसभा निवडणुकीत राज्याला बळकट करण्यासाठी आपले एक मत महत्त्वाची भूमिका बजावते. चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे असते.

त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपल्या हक्काचा वापर करून मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जाते. आपले व आपल्या पुढील पिढीचे भवितव्य ठरविणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतोत्सवात सहभागी होऊन लोकशाही बळकटी करण्याचे आवाहन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वात विकसित राज्य आहे, जिथे प्रत्येक प्रौढ नागरिकास आपल्या मताचा वापर करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. सरकार बनविण्यासाठी प्रत्येक मतदाराची महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येकाने असा प्रतिनिधी निवडावा जो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्याच्या विकासात योगदान देईल आणि जनहितासाठी व त्यांच्या विकासासाठी कार्य करेल. प्रतिनिधी निःपक्षपाती असून, जनतेचा विचार करणारा असावा, हे निवडण्याचा अधिकार आपणास आहे, तरी सर्वांनी आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावला पाहिजे.

- रितेश माने, नवमतदार

निकोप आणि सशक्त लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपले मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. त्यातूनच बलशाली भारत निर्माण होईल. जिल्ह्यात यावेळेस ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यास मतदारांनी सहकार्य करावे.

- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि ते आपले राष्ट्रीय कर्तव्यही आहे. मतदानाचा अधिकार संविधानाने आपल्याला दिला आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे.

- डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा.

जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत १०० टक्के सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यात सक्रिय पुढाकार घ्यावा. त्यासाठी क्रांती, शौर्य, समाजसुधारणा यांचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्हा निश्चित १०० टक्के मतदान करेल.

- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

मतदानाने आपले राज्य आपला देश बळकट होतो. प्रत्येक मताचे मूल्य असते. आपण स्वत: आणि इतरांना मतदान करण्यास प्रोत्साहित करा. सर्वांनी मिळून मतदानाचा हक्क बजावूया.

- फरोख कूपर, उद्योजक

लोकशाहीमध्ये मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. तो हक्क आपण बजावला नाही, तर जे सरकार अथवा प्रतिनिधी निवडून येतात त्यांच्यावर टीका करण्याचा कोणत्याही हक्क राहणार नाही. त्याशिवाय तुम्हाला त्यांना काम सांगण्याचाही अधिकार राहात नाही. प्रत्येकाला मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मतदारांच्या जवळ मतदान केंद्र असावे, यासाठी दुर्गम भागातही आता मतदान केंद्र उभारली जातात. वय वर्ष ८५ पेक्षा अधिक असणाऱ्या मतदारांना गृह मतदानाची संकल्पना अभिनव आहे.

याचे स्वागत करतानाच त्यात दोन सूचना करावेसे वाटते. वय वर्ष ६० पासून पुढे अनेकांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वयाची मर्यादा ७० ते ७५ असावी. मतदार यादीत मतदाराची वयाची नोंद असल्यास नोंदणीची किचकट प्रक्रिया न अवलंबता प्रशासनाने आपणहून मतदारांच्या घरी जाऊन त्यांचा हक्क बजावून घ्यावा. हल्ली बरेच लोक विशेषत- युवा वर्ग मतदानाचा दिवस सुटी समजून सहलीचे नियोजन करतात. यामध्ये सुशिक्षित लोक असतात, हे दुर्दैव म्हणावे लागले. हा फंडा बंद करून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

- अरुण गोडबोले, ज्येष्ठ साहित्यिक

प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा अधिकार आहे. लोकांनी त्यांच्या मताचा उपयोग राष्ट्र उभारणी आणि विकासात संपूर्ण सहकार्य करण्यासाठी करू शकतात. राज्याच्या विकासासाठी व जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान महत्त्वाचे आहे. तुम्हाला बदल घडवायचा असेल, तर मतदान हा उत्तम मार्ग आहे.

- आकांक्षा शरद निंबाळकर, नवमतदार

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT