- सचिन शिंदे
कऱ्हाड - कऱ्हाड शहरासहीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अतुल भोसले यांचे प्रयत्न लक्षवेधी आहेत. विकासकामांसाठी सातत्याने त्यांचा पाठपुरावा असतो. कऱ्हाड दक्षिणमध्ये भरघोस निधी खेचून आणण्यासाठी अतुल भोसले दाखवत असलेली तळमळ वाखाणण्यासारखे आहेत. येत्या काळात कऱ्हाड दक्षिणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अतुल भोसले यांना साथ द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सरकारच्या माध्यमातून आणि अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या छत्रपती शिवाजी स्टेडीयम व वाखाण रस्त्याच्या यांच्या १४६ कोटी ५० लाखांच्या निधीच्या कामांचे ई-भूमीपूजन झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाईन उपस्थितांशी संवाद साधला.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील काटकर, माजी आमदार आनंदराव पाटील यांचीही भाषणे झाली. माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक विनायक पावसकर, माजी उपाध्यक्ष सुभाष जाधव, जनशक्ती आघाडीचे नेते अरुण जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात झालेला स्टेडियमचा विकास आराखडा अतिशय सुरेख आहे. तो क्रीडा वैभवात भर घालणारा आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी ९६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला. शहरातील वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्याच्या विकास प्रकल्पाच्या कामालाही लवकरच प्रारंभ होणार आहे. त्या दोन्ही प्रकल्पांमुळे कऱ्हाडच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
अतुल भोसले म्हणाले, कऱ्हाडला चांगळे खेळाडू घडविणे, आमचे उद्दिष्ट आहे. आसपासच्या जिल्ह्यात कुठेही नसेल असे सर्व सुविधांनी उपयुक्त असे स्टेडियम घडवायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नुतनीकरणाची सुरवात म्हणजे क्रिडानगरी म्हणून नवी ओळख निर्माण करण्याचे पहिले पाऊल आहे. जाधव कुटुंब व ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे १९७२ मध्ये स्टेडियमची उभारणी झाली.
त्यानंतरच्या जवळपास ५२ वर्षात या स्टेडियमसाठी इतका मोठा निधी उपलब्ध झाला नाही. या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करुन, ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्यासारखे खेळाडू या मातीत पुन्हा तयार करण्याचे माझे स्वप्न आहे. कऱ्हाडला भविष्यात आयपीएलचे सामने घडवून आणण्याचेही ध्येय्य आहे. अभिषेक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. सुहास जगताप यांनी प्रास्तविक केले. अतुल पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.