औंध (सातारा) : पोक्सो गुन्ह्यातील (Pocso Crime) कलमांची शिथिलता कमी करण्यासाठी आरोपींकडून औंध पोलीस ठाण्यातील (Aundh Police Station) वरिष्ठ लिपिक चंदन शिंदे याने दीड लाखांची मागणी करून, त्यापैकी ५० हजारांची लाच याच पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे (Sub-Inspector of Police Snehal Somde) यांचे पती सुशांत सुरेश वरुडे यांच्या हस्ते स्वीकारली, त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. (Aundh Police Station Employee Arrested By Anti Corruption Department In Bribery Case Satara Crime News)
पोलिस नाईक चंद्रकांत शिंदे यांच्या सांगण्यावरून दीड लाखांची लाच मागणी करून तडजोडीअंती रक्कम पन्नास हजार घेताना सुशांत वरुडे याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तक्रारदारांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदारांना सदर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पडताळणीमध्ये आरोपी नंबर दोन सुशांत सुरेश कोरडे (वय 35 ) खासगी व्यक्ती यांनी औंध पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक चंद्रकांत दादासाहेब शिंदे (वय 34) त्यांच्या सांगण्यावरून दीड लाखांची लाच मागणी करून तडजोडीअंती रक्कम पन्नास हजार घेताना सुशांत वरुडे याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. सदर घटनेमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर लाचलुचपतप्रकरणी पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलिस नाईक राजे, पोलीस कॉन्स्टेबल खरात यांनी सहभाग घेतला होता. सदर गुन्ह्याची नोंद रात्री उशिरापर्यंत औंध पोलीस ठाणे परिसरात सुरू होती. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश जगताप करीत आहेत.
Aundh Police Station Employee Arrested By Anti Corruption Department In Bribery Case Satara Crime News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.