सातारा : सध्या देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सर्वत्र लाॅकडाउन करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन उठविण्यात आले असले तरी एका वाहनात कमी व्यक्ती बसविण्याच्या नियमामुळे ग्राहकांवर आर्थिक बाेजा पडत आहे. त्यामुळे रिक्षात बसण्यास ग्राहक तयार नाहीत. परिणामी, रिक्षा चालक-मालक दररोज शहरामध्ये जेमतेम 200 ते 300 रुपये कमवत आहेत.
कोयना धरण परिसरात भुकंप; जिवीत हानी नाही
त्यामध्ये इंधनवाढ, शासनाचे विविध कर, इन्शुरन्स, बॅकलोन, मुलांचे शिक्षण, कुटुंबातील आजारपण, वाढती महागाई, वाढीव रिक्षा संख्या, शहरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरु असून इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची भावना सातारा तालुका चालक-मालक रिक्षा कृती समितीने मांडली आहे.
सातारकरांनाे... कुटुंबाचे, समाजाचे रक्षण करण्यासाठी हे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह
राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत दुष्काळ निधी दिला. काेराेनाच्या काळात लाॅकडाउनमध्ये गोरगरीबांना मदत केली, बांधकाम कामगारांना दाेन हजाराची मदत जाहीर केली. मात्र, रिक्षा चालकांसाठी काेणतीच याेजना आणलेली नाही. रिक्षा चालक-मालक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सावधान! मोबाईलवरून बँक खात्याची माहिती देत असाल तर पडू शकते महाग
रिक्षा चालक-मालकांच्या मुलांचे शिक्षण, औषधोपचार व उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सरकारने रिक्षा चालकांना किमान पाच हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी सातारा तालुका चालक-मालक रिक्षा कृती समितीने केली आहे.
कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी या शहरात करावे लागते 15 तासांचे वेटिंग!
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.