गृहराज्यमंत्री देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.
पाटण (सातारा) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिष्ठेची केलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Satara Bank Election) आज पाटण तालुक्यातील ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल (Dnyanojirao Salunkhe High School) येथे शांततेत व उत्साहात मतदान सुरू झाले आहे.
सोसायटी मतदार संघातून उमेदवार असणारे गृहराज्यमंत्री देसाई व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर (NCP leader Satyajitsingh Patankar) यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पोलिस बंदोबस्तात सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झालीय. साडे नऊच्या सुमारास सत्यजितसिंह पाटणकर टूरवर गेलेल्या मतदारांसह मतदान केंद्रावर दाखल झाले. साडे दहाच्या सुमारास मंत्री देसाई समर्थकांसह दाखल झाले आणि मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
मतदान केंद्राचे परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक निग्रज चौखंडे, मल्हारपेठचे उत्तम भापकर, कोयनानगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.