Shashikant Shinde esakal
सातारा

राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का; अर्ज माघारीस रांजणेंचा नकार

उमेश बांबरे

मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक लढण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी अर्ज मागे घेणार नाही.

सातारा : सर्वसमावेशक पॅनेलमधील उमेदवारांचा तिढा सोडविताना विरोधात दाखल अर्ज काढून घेण्यासाठी नेत्यांनी केलेल्या सूचनेकडे पाठ फिरवत इच्छुकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का दिला. जावळी सोसायटीतून (Jawali Society) अर्ज दाखल केलेले ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे जावळी सोसायटी मतदारसंघात आमदार शशीकांत शिंदेंपुढे (MLA Shashikant Shinde) अखेरच्या क्षणी आव्हान निर्माण झाले आहे. नेत्यांतील जागा वाटपाचा तिढा कायम राहिल्याने आता पुन्हा आज (मंगळवारी) चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज राजकिय खलबतांचे केंद्र हॉटेल पर्ल ठरले. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची काल दिवसभर जागा वाटप व अर्ज मागे घेण्याबाबतच्या चर्चेसाठी बैठक झाली. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Speaker Ramraje Naik- Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, शशीकांत शिंदे, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेलच्या उमेदवारांची वाट सोपी व्हावी, यासाठी विरोधात आलेले अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांनी चर्चेची दुसरी फेरी झाली. या वेळी जावळी विकास सेवा सोसायटीतून आमदार शशीकांत शिंदेंच्या विरोधात अर्ज दाखल केलेले ज्ञानदेव रांजणे यांना आज चर्चेसाठी बोलवले होते. बैठकीत त्यांना अर्ज मागे घेण्याबाबत नेत्यांनी सूचना केली. पण, त्यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक लढण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी अर्ज मागे घेणार नाही, असे सांगितले. त्यांची मनधरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यासही प्रतिसाद न देताच ते निघून गेले. पाटण सोसायटीतून विक्रमसिंह पाटणकर पिता पुत्रांपैकी कोणाचा अर्ज मागे घ्यायचा आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कसे ॲडजेस्ट करायचे याविषयी चर्चा झाली. पण, त्यातून काहीही अंतिम निर्णय झाला नाही.

त्यानंतर जागा वाटपाबाबतची चर्चा झाली. या वेळी सर्वजण आपापल्या जागांवर ठाम राहिल्याने वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती रामराजेंनी बैठक आटोपती घेतली. शिवेंद्रसिंहराजेंनी स्वीकृत संचालकाची आणखी एका जागेची मागणी केल्याचे सांगण्यात आले. नेत्यांतील जागा वाटप पूर्ण होत नाही, तोपर्यंत अर्ज कोणाचा ठेवायचा आणि कोणाचा मागे घ्यायचा हे निश्चित करता येत नसल्याने चर्चा अपूर्ण राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT