Udayanraje Bhosale esakal
सातारा

कांटे की टक्कर; भाजपच्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीनं शोधला उमेदवार

उमेश बांबरे

उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार नसल्याचे चित्र आहे.

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) उमेदवारांची यादी कोरेगाव व खटाव सोसायटीची जागा वगळून अंतिम करण्यात आली; पण जागा वाटपात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) चार जागांवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय केला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २५) सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्या विरोधात राष्ट्रवादीने दोन उमेदवार शोधले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण आणि दुग्धविकासमधून निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांची महत्त्वपूर्ण व तातडीची बैठक नुकतीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Speaker Ramraje Naik Nimbalkar) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, विक्रमसिंह पाटणकर, तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. या वेळी जिल्हा बँकेच्या सर्व मतदारसंघांवर इच्छुक उमेदवारनिहाय चर्चा करण्यात आली. या वेळी सहकारमंत्री पाटील व शिवेंद्रसिंहराजे हे चार जागांच्या मागणीवर ठाम राहिले. शिवेंद्रसिंहराजेंकडे जिल्हा बँकेतील २२ टक्के मते असल्याने त्यांनी सातारा सोसायटीसह आणखी चार जागा हव्या आहेत. सहकारमंत्री पाटील यांनाही कऱ्हाड सोसायटीसह चार जागा हव्या आहेत. त्यामुळे दोघांच्या मागणीवर अर्ज दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार तोडगा काढणार आहेत. सोसायटीच्या खटाव व कोरेगाव मतदारसंघांत वाद निर्माण झाल्याने येथील निर्णय नंतर घेतला जाणार आहे; पण खटावमधून नंदकुमार मोरे आणि इंदिरा प्रभाकर घार्गे, तसेच कोरेगावातून सुनील माने व कांतिलाल पाटील हे इच्छुक आहेत.

कोरेगावातून सुनील माने यांना विरोध झाला आहे. खटावमधून नंदकुमार मोरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. खासदार उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीने दोन उमेदवार शोधले आहेत. त्यांची नावे मात्र, गुलदस्त्यात असून, सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतरच त्यांची नावे स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंना निवडणूक सोपी जाणार नसल्याचे चित्र आहे. जावळी सोसायटी मतदारसंघातून शशिकांत शिंदेंच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे व दीपक पवार यांचे अर्ज आहेत. यातील श्री. रांजणे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवण्यात आली आहे. बँका व पतसंस्था मतदारसंघ व औद्योगिक, विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघावर सहकारमंत्री, तसेच शिवेंद्रसिंहराजेंनी दावा केल्याने त्यांच्यापैकी कोणाच्या वाटणीला हा मतदारसंघ येणार त्यावर उमेदवार दिला जाणार आहे. राखीव जागांबाबतही उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

राष्ट्रवादीची संभाव्य यादी अशी

सोसायटी मतदारसंघ- कऱ्हाड- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलटण- सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जावळी -आमदार शशिकांत शिंदे, पाटण- विक्रमसिंह पाटणकर, वाई- नितीन पाटील, माण- मनोज पोळ, खंडाळा- दत्तानाना ढमाळ, महाबळेश्वर- राजेंद्र राजपुरे, सातारा- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. खरेदी- विक्री संघ - आमदार मकरंद पाटील, कृषी प्रक्रिया मतदारसंघ- शिवरूपराजे खर्डेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT