Minister Ramdas Athawale esakal
सातारा

अतुल बाबांमुळेच माझा जीव वाचला

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : कोरोना महामारीत (Coronavirus) आरोग्याची काळजी घेण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा हॉस्पिटलनं (Krishna Hospital) अग्रेसरपणे केलं आहे. अनेकांसाठी कृष्णा हॉस्पिटल आधारवड बनले, अशी प्रशंसा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी केली. सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी कृष्णा हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना महामारीत आरोग्याची काळजी घेण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा हॉस्पिटलनं अग्रेसरपणे केलं आहे.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये आगमन होताच भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी आठवले यांचे स्वागत केले. कोरोना काळातील कार्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आठवले यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंत्री आठवले म्हणाले, जयवंतराव भोसले यांनी लावलेले रोपटे वटवृक्ष बनला आहे. गरिबांना आधार देत आहे. कोरोनाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलमधून सुमारे सात हजार रुग्ण बरे झाले. दाखल होणारे रुग्ण कुठल्याही जातीचे असोत, धर्माचे असो, कोणत्याही पक्षाचे असो अथवा गरीब कष्टकरी, मजूर व मध्यमवर्गीय असो या सर्वांना चांगल्या सुविधा व सेवा देण्याचे काम कृष्णा करत आहे. कोरोना काळात रुग्णांकडून एकही रुपया न घेता, त्यांच्यावर उपचार केले व त्यांना कोरोना मुक्त केले. त्यामुळे संस्थेबद्दल नितांत आदर आहे. अशा कामाला नेहमीच पाठिंबा आहे. केंद्रीय स्तरावर लागणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी मी सदैव तयार आहे.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सचिन बनसोडे, आप्पासाहेब गायकवाड, जयवंत विरकायदे, युवराज काटरे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, जितेंद्र पाटील, बाजीराव निकम, जयवंत जगताप, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, बाळासाहेब घाडगे, नारायण शिंगाडे, रामभाऊ सातपुते, संजय पवार, दिगंबर वास्के, डॉ. सारिका गावडे, संतोष हिंगसे उपस्थिती होती.

बनुबाईंना अश्रू अनावर..!

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे नेतृत्व मानून काम करणाऱ्या शेरेच्या सामाजिक कार्यकर्त्या बनुबाई येवले यांना कृष्णा हॉस्पिटल येथे मंत्री आठवले भेटल्यावर, त्यांनी येवले यांची विचारपूस करताच बनुबाईंना अश्रू अनावर झाले. त्यांनी रडत ‘अतुल बाबांमुळे माझा जीव वाचला’, असं आठवलेंना सांगितलं. आजारपणात कृष्णा हॉस्पिटल माझ्या मदतीला कायमच असते, अशी भावनाही बनुबाईंनी व्यक्त करून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT