कऱ्हाड : शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेकांना बेड उपलब्ध होत नसल्याने काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्याचा विचार करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बाधित रुग्णांना बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी 635 बेड शहरासह तालुक्यातील रुग्णालयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कऱ्हाडला एक हजार 411 बाधितांना एका वेळी उपचार मिळण्याची सोय होणार आहे.
ऑक्सिजन ग्रुपला यंत्रांचे पाठबळ; पालकमंत्र्यांकडून कौतुक
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर ऍण्टीजेन टेस्टही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळेही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत शहरातील रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. सध्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये 400, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 75, एरम हॉस्पिटलमध्ये 61, श्री हॉस्पिटलमध्ये 40 बेडची उपलब्धता आहे. त्याचबरोबर पार्लेतील सेंटरमध्ये 200 रुग्णांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या हजारात आणि बेड तोकडे अशी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी अनेकांना ऑक्सिजनचे बेड मिळाले नाहीत. त्यातील काही रुग्णांना जीवासही मुकावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने बेड वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले होते. आमदार चव्हाण यांनी बहुउद्देशीय हॉलमध्ये नवीन कोरोना सेंटर करण्याचेही सूचित केले होते. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली. त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे.
सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय
त्याअंतर्गत मध्यंतरी जिल्हाधिकारी सिंह यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 55 बेडची नवीन व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तेथे 55 नवीन बेड उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी सिंह यांनी कऱ्हाड हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने अधिगृहीत केले आहे. तेथे 60 नवीन बेडची व्यवस्था होणार आहे. त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटलला आणखी 200 बेड, सह्याद्री हॉस्पिटलला आणखी 75, श्री. हॉस्पिटलला आणखी 20 बेड, सह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेज 100, जैन समाजाच्या सेंटरमध्ये 25, कऱ्हाड हॉस्पिटलला 60, वारणा हॉटेलमध्ये 50, यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये 50 अशा वाढीव बेडची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार हॉस्पिटलचे 986 आणि कोविड सेंटरचे 425 असे 1411 बेड उपलब्ध होणार आहेत. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी संबंधित बेड संदर्भातील पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
जिल्हा परिषद शाळेतील गुरूजीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर व तालुक्यात बेड वाढविण्यात येत आहेत. त्यानुसार नवीन 635 बेड उपलब्ध होतील. त्यामुळे कऱ्हाडला 1411 रुग्णांना एकावेळी बेड मिळणे शक्य होणार आहे.
उत्तम दिघे, प्रांताधिकारी
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.