मलकापूर (सातारा) : सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता कऱ्हाड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत पत्र मोहीम (Letter campaign) राबवली. त्यातून सुमारे ५०० पत्रे पंतप्रधानांना पाठवण्यात आली. बेळगाव (Belgaum), कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी ६५ वर्षांपासून लढा सुरू आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा, यासाठी जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान दिले.
कऱ्हाड तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत पत्र मोहीम राबवली. त्यातून सुमारे ५०० पत्रे पंतप्रधानांना पाठवण्यात आली.
सामान्य मराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपापल्या परीने हा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हा रक्तरंजित लढा आजतागायत सुरू आहे. ‘सीमाप्रश्न मार्गी लावून ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा,’ अशी भावना तरुण- तरुणींनी पत्राद्वारे व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५०० पत्रे लिहिली आहेत. वैष्णव काशीद- पाटील, धैर्यशील कदम, समर्थ सूर्यवंशी, यश अतकरे, आदिती देशमुख, वैष्णवी जाधव, पल्लवी जायभाये, वैष्णवी सर्वज्ञ यांनी पत्र मोहीम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.