Udayanraje Bhosale  sakal
सातारा

Udayanraje Bhosale : यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न द्या ; उदयनराजे, कऱ्हाडच्या सभेत मोदींना देणार निवेदन

यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या रूपाने देशाला जिल्ह्यातील नेतृत्‍व मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विचारधारेनुसार त्‍यांची वाटचाल होती. त्‍यांची विचारधारा लोककल्‍याणाची आहे. त्‍यांच्‍या नावाचा वापर निवडणुकांपुरताच करण्‍यात आला. मात्र, त्‍यांचा विचार कोणीही आचरणात आणला नाही.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या रूपाने देशाला जिल्ह्यातील नेतृत्‍व मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या विचारधारेनुसार त्‍यांची वाटचाल होती. त्‍यांची विचारधारा लोककल्‍याणाची आहे. त्‍यांच्‍या नावाचा वापर निवडणुकांपुरताच करण्‍यात आला. मात्र, त्‍यांचा विचार कोणीही आचरणात आणला नाही. मानसपुत्र म्‍हणवणाऱ्यांनीही यशवंत विचारांचे पालन केले नसल्‍याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्‍यावर नाव न घेता केली. यशवंतराव चव्‍हाण यांना भारतरत्‍न देण्यात यावा, अशी मागणी आम्‍ही सोमवारी कऱ्हाड येथील सभेदरम्‍यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे निवेदनाद्वारे करणार असल्‍याचे उदयनराजेंनी सांगितले.

जलमंदिर येथील पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. ते म्‍हणाले, ‘‘कऱ्हाड येथे सोमवारी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदींची सभा यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या कर्मभूमीत होत असून, त्‍या वेळी त्‍यांना भारतरत्‍न देण्‍याची होणारी मागणी विशेष आहे. यशवंतरावांचे विचार पुढील पिढीकडे हस्तांतरित व्‍हावेत, यासाठी आम्‍ही ही मागणी करणार आहोत. यशवंतरावांचे जिल्‍हा, राज्‍य आणि देशाच्‍या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. स्‍वत:साठी फायदा घेणाऱ्यांनी त्‍यांच्‍या योगदानाची आणि विचारांची दखल घेतली नाही व त्‍याबाबत तेच जास्‍त सांगतील,’’ असे म्‍हणत नाव न घेता पुन्‍हा एकदा पवारांवर टीका केली.

मुंबई कृषी उत्‍पन्न बाजार समितीतील घोटाळ्यावरून जाणीवपूर्वक लक्ष्‍य केले जात असल्‍याच्‍या आमदार शशिकांत शिंदेंच्‍या आरोपांवर ते म्‍हणाले, ‘‘हे प्रकरण २०१३ मधील आहे. त्‍यावेळी सत्ता त्‍यांचीच होती. त्‍यांनीच हा घोटाळा दाबून ठेवला. जर काहीही केले नसेल, तर घाबरायचे काहीच कारण नाही. या घोटाळ्याबाबत न्‍यायालयाने काही निरीक्षणे नोंदवत काही आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्‍या यंत्रणा त्‍याचे पालन करतील. नाही केले, तर न्‍यायालयाचा अवमान होईल.’’

त्‍या वेळी कल्‍पना नव्‍हती...

आपण दहा वर्षे राष्‍ट्रवादीत होता. प्रत्‍येक टप्‍प्‍यावर शशिकांत शिंदे यांनी आपल्‍याला पाठबळ दिले. त्‍या वेळी तुम्‍हाला या घोटाळ्याची कल्‍पना नव्‍हती का? या प्रश्‍‍नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘त्‍या वेळी मला या घोटाळ्याची कल्‍पना नव्‍हती आणि माहिती असती तर त्‍याचवेळी मी आरोप केले असते.’’

गायब करण्‍याची काँग्रेसची परंपरा

विचार असू अथवा माणूस त्‍यांना गायब करण्‍याची काँग्रेसची परंपराच आहे. लोकप्रिय, जनाधार असणाऱ्यांच्‍या बाबतीत काय होते, ते आपण पाहिले आहे. काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीसाठी अर्ज भरण्‍यासाठी निघालेल्‍या राजेश पायलट यांचा अपघात झाला. माधवराव सिंधीया, वाय. एस. आर. रेड्डी यांचाही अपघात झाल्‍याचे सांगत उदयनराजे यांनी या प्रकरणाबाबत संशय व्‍यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT