कऱ्हाड (सातारा) : ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) वतीने आज (शनिवारी) सकाळी येथील कोल्हापूर नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. काही कालावधीनंतर पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले. ओबीसींना आरक्षण (OBC Political Reservation) मिळावे या मागणीसाठी आज भाजपने येथील कोल्हापूर नाक्यावर आंदोलन केले. (Bharatiya Janata Party Agitation At Karad For OBC Reservation Satara Marathi News)
ओबीसींना आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज भाजपने कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावर आंदोलन केले.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, नितीन वास्के, सरचिटणीस महेंद्र डुबल, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, उत्तरचे अध्यक्ष महेंद्र जाधव, पाटणचे अध्यक्ष भैयासाहेब पाटणकर, महिला आघाडीच्या सीमा घार्गे, सारिका गावडे, भाग्यश्री रोकडे, निलीमा कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, विशाल कुलकर्णी, विवेक भोसले, सागर लादे, नितीन शहा, उल्हास बेंद्र आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मारुन बसले होते. आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे व अन्य घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही वेळानंतर शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील (Police Inspector B. R. Patil) यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात (Karad Police Station) नेले.
Bharatiya Janata Party Agitation At Karad For OBC Reservation Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.