राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस व शिवसेनेकडून होत आहे.
सातारा : जिल्हातील गट, गणांची नव्याने रचना होऊन वाढलेले दहा गट व २० गण लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून निवडणुकीची तयारी करण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी मात्र जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (NCP), भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) व काँग्रेसनेही (Congress) स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे इच्छुकांना यावेळी पक्षासह वाढलेल्या गट, गणांत नशीब आजमावण्यास मिळणार आहे.
सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत, तर काँग्रेसचे सात सदस्य आहेत. भाजपचे सहा आणि शिवसेनेचे दोन सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आले. पण, स्थानिक पातळीवर मात्र, राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस व शिवसेनेकडून होत आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय या दोन्ही पक्षांना आला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसह नगरपंचायत व पालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला हिसका दाखवण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव आमदार असून जिल्हा परिषदेचे सात सदस्य आहेत. शिवसेनेने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde), संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली तीन जिल्हाप्रमुखांना सोबत घेऊन निवडणूक स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपने आपली सहा सदस्यसंख्या दहा ते २० पर्यंत नेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार आहे. यावेळेस सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे भाजपसोबत राहणार की राष्ट्रवादीसोबत, हे महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद आजमवण्याचा प्रयत्न सुरू केला असून स्वबळाच्या नाऱ्यातून कोणाच्या हातात किती गट व गण येतील, याची गणिते जुळविण्यास जिल्ह्यातील नेत्यांनी सुरवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील या घटक पक्षांत सध्या वर्चस्ववाद सुरू आहे.
राष्ट्रवादी : ४१
भाजप : ६
शिवसेना : ६
काँग्रेस : ६
सातारा विकास आघाडी (उदयनराजे समर्थक)- ३
पाटण विकास आघाडी (शंभूराज देसाई गट)- २
कऱ्हाड विकास आघाडी (उंडाळकर गट)- ३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.