सातारा

तीन चाकी सरकारचा दूध उत्पादकांकडून धिक्कार, भाजपसह संघटनांचे सातारा जिल्ह्यात आंदाेलन

उमेश बांबरे

सातारा : दूध उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे, तीन चाकी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाला अनुदान मिळावे, अशी मागणी करत सातारा जिल्ह्यात शनिवारी (ता.एक) विविध तालुक्यांमध्ये आंदोलन केले. काही तालुकांमध्ये सरकाराच्या कारभाराचा निषेध व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत दूध रस्त्यावर दूध आेतून दिले तर काही ठिकाणी निवेदन, दूध वाटप असे आंदाेलन झाले.
 
सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पोवई नाका व मोती चौक येथे दूध दरासाठीचे आंदोलन झाले. या वेळी श्री. भोसले म्हणाले, ""सध्या दुधासह शेती उत्पादनांना भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कोरोनाचे संकट असताना शेतकरी शांत बसला नाही. विविध अडचणी असूनही शेतकऱ्याने रोजच्या रोज दूध, भाजीपाल्याचा पुरवठा केला. अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारने करावे.'' या वेळी भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, विठ्ठल बलशेटवार, अविनाश कदम, धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, प्राची शहाणे, ज्ञानेश्‍वर फरांदे, किशोर गोडबोले, किशोर पंडित, आप्पा कोरे, मनीषा पांडे, चंदन घोडके, रवी आपटे, संतोष प्रभुणे, लक्ष्मण चव्हाण, वैशाली टंकसाळे, सुनील काळेकर, रीना भणगे, सुनिशा शहा, विक्रम बोराटे, दीपिका झाड, डॉ. उत्कर्ष रेपाळ, शैलेंद्र कांबळे, प्रकाश शहाणे, अमोल कांबळे, किशोर गालफाडे, धीरज घाडगे, डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, रोहित साने, तानाजी भणगे, अविनाश पवार, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

अभिनेते सयाजी शिंदेंची झाडांशी घट्ट मैत्री...!  

कऱ्हाड : दूध दरासाठी भारतीय जनता पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रिपाई आठवले गट या मित्र पक्षांमार्फत येथील प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, ऍड. विजय पाटील, नितीन शाह, प्रशांत कुलकर्णी, उल्हास बेंद्रे, विजय शिंदे, प्रमोद शिंदे, राहुल भिसे, धनंजय खोत, सीमा घार्गे, धनश्री रोकडे, राजेंद्र कुंडले, विश्वनाथ फुटाणे, सुहास चक्के, शुभम पवार, अभिषेक कारंडे, निखिल शाह, विवेक भोसले यांनी प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. 

बकरी ईदला रक्तदान; मुस्लीम समाजाने दिला अनोखा संदेश

मलकापूर : दुधावर अनुदान द्यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ढेबेवाडी फाट्यावर निदर्शने करण्यात आली. भाजपचे नेते शेखर चरेगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी दुधाची नासाडी न करता गोरगरिबांना दुधाच वाटप करून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा डॉ. सारिका गावडे, किसान मोर्चाचे शंकर पाटील, तानाजी देशमुख, संजय पवार, सुदर्शन पाटस्कर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब शेरेकर, धनाजी माने, नगरसेवक भास्कर सोळवंडे, राजू मुल्ला, आण्णा काशीद, आबासो गावडे, सूर्यकांत खिलारे, संतोष हिंगसे, विजेंद्र जाधव, पांडुरंग निकम, अमर निकम, शंकर साळुंखे, आबा गोरे, उमेश मोहिते, दिग्विजय पाटील, ऍड. बाळासाहेब पाटील, गफार नदाफ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं सौभाग्याचं लेणं..!
 
मेढा : येथील मुख्य बाजार चौकात भारतीय जनता पक्ष, रासप, रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन दूध दरवाढीच्या घोषणा देण्यात आल्या. बाजार चौकातून मोर्चाने तहसीलदार कार्यालय येथे सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांना निवेदन देण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक विकास देशपांडे , माजी सभापती कांतिभाई देशमुख, विलास शिंदे, भानुदास ओंबळे, जितेंद्र पवार, सदाशिव जवळ, रमेश तरडे, विजय तरडे, वैशालीताई सावंत, सीताबाई सावंत, सीताताई सुतार, मोनिकाताई परामणे, प्रदीप बेलोशे, दीपक गावडे, सुभाष गुजर, मेघराज बेलोशे, जगन्नाथ गावडे, विजय गोळे आदी उपस्थितीत होते. 

साताऱ्यातील हे महंत अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देणार 51 लाख दक्षिणा 

बिजवडी : भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने दहिवडी येथे दूध दरवाढ आणि दूध भुकटीला अनुदान द्यावी, या मागणीसाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गोरे म्हणाले, ""बॅंकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, नकली बियाणामुळे सोयाबीनची दुबार पेरणी, अतिवृष्टी, खतांच्या तुटवडा आणि काळाबाजार, वादळ अशा अनेक संकटांनी शेतकरी बेजार झाले आहेत. दुधाचे दर कमी झाल्याने तर शेतकरी पूरता कोलमडून गेले आहेत.'' या वेळी भाजप सातारा जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, नगराध्यक्ष सतीश जाधव, धीरज दवे, डॉ. काळे, गोरख मदने, सोमनाथ भोसले, विशाल बागल, हिम्मत कदम, बबन काळेल, गोरख शिंदे, काका माने, दादा बोराटे, काका बनसोडे, सिद्धार्थ गुंडगे, महेश कदम, इंगवले, सचिन पुकळे, आप्पा बोराटे, किरण गोरे, रवी तुपे, प्रशांत वायदडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सोनसाखळ्या गेल्या, कोरोना कधी जाणार? या गावातील लोकांना चिंता 

वाई : शहरात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व प्रदेश भाजप कार्यकारिणी निमंत्रित सदस्य मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्स ठेऊन आंदोलन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष राकेश फुले, काशिनाथ शेलार, विजयाताई भोसले, अजित वनारसे, शुभदा नागपूरकर, तेजस जमदाडे, यशवंत लेले, विजय ढेकाणे यांची भाषणे झाली. या प्रसंगी सचिन गांधी, देवानंद शेलार, मनीषा घैसास, मिलिंद खामकर, अनिल महांगडे, नरेंद्र महाजन, श्रीरंग दिवेकर, प्रसाद चरेगावकर, मंजूषा भाटे, दीपक जाधव, अजय कामटे, उत्तम जायगुडे, नगरसेविका वासंती ढेकाणे, केतन रासकर, केशव सूर्यवंशी, शिवम यादव, विश्वनाथ जगताप, तुषार सुळके, अरविंद बोपर्डीकर, विजय विभूते, गुलाब डोंगरे, गोपाळ पुजारी, शिवाजी आरडे, किशोर फुले, संजय डोईफोडे, चारुदत्त जमदाडे, गौरव ससाणे, किरण फरांदे, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या लढाईत लोणंदच्या डॉक्‍टरांची रात्रंदिवस सेवा... 

पुसेगाव : दुधाची दरवाढ करून दुधाला अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी भरत मुळे, प्रकाश जाधव, अंकुशराव पाटील, प्रदीप देशमुख, नीलेश जाधव, रूपेश तोडकर, तेजस जाधव, भाजप कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. याबराेबरच म्हसवड येथे राष्ट्रीय समाज पक्ष व महायुतीच्या वतीने येथील सातारा- पंढरपूर रस्त्यावर दूध बंद आंदोलन करून गोरगरिबांना मोफत दूध वाटप करण्यात आले. या आंदोलनात प्रा. सचिन होनमाने पदाधिकारी सहभागी झाले होते. 
विंग येथे  दुधाला दरवाढ मागणीवरून अखिल भारतीय किसान सभा कऱ्हाड तालुका समितीने दूध अभिषेक आंदोलन केले. शासनाच्या विरोधात निषेध नोंदवला. किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अशोक यादव, सचिव माणिक अवघडे, तात्यासाहेब पाटील, आनंद विंगकर, हणमंत हुलवान, रवींद्र खबाले, आनंदा शिंदे, अरविंद खबाले, शिवाजी गुरव, तानाजी खबाले, अरुण देशमुख, मधुकर खबाले, तानाजी रौंदाळे यासह उत्पादक उपस्थित होते. 

शब्बास! हा जवान करतोय मातृभूमीची अशीही सेवा 

लोणंद : दूध दरवाढ व दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्या विविध मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होत लोणंद शहर भारतीय जनता पार्टी व भाजप महिला मोर्चा यांच्या वतीनेही बाजारतळावर भैरवनाथ दूध डेअरी येथे एल्गार अंदोलन छेडण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळालाच पाहिजे, दूध पावडरला भाव मिळालाच पाहिजे, दुधाचे अनुदान थेट शेतकऱ्याच्या हातात मिळाले पाहिजे, तीन चाकी सरकारचा निषेध असो. आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान, दूध पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदान द्या.अन्यथा एक ऑगस्ट रोजी भाजपा, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई, महायुतीच्या वतीने राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार लोणंद शहर भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चाच्या वतीने या अंदोलनात सहभागी होत आज हे अंदोलन छेडले.यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोहन क्षीरसागर, भिकाजी शेळके, शरद शेळके व दत्ता शेळके यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी राहुल घाडगे,हर्षवर्धन शेळके- पाटील, प्रदीप क्षीरसागर, प्राजित परदेशी, दिपीका घोडके, दर्शना रावळ,  चारुताई शेंडे, मिलिंद क्षीरसागर, महादेव शेळके, राजकुमार शेळके, रामभाऊ शेळके, राहुल खरात, संदीप शेळके आदी उपस्थित होते.

पाचवडला दूध वाटपाने आंदोलन 

भुईंज : पाचवड येथील भाजप कार्यकर्त्यांनी किसन वीर सातारा कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले 
यांच्या मार्गदर्शनाखाली दुधाचे वाटप करून शांततेत आंदोलन पार पाडले. भाजप कार्यकर्त्यांनी पाचवड येथे दूध ओतण्यापेक्षा त्याचे गरिबांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी विक्रम पावसकर, प्रदीप क्षीरसागर, सचिन घाडगे, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, पाचवडच्या सरपंच अर्चना विसापुरे, गजानन भोसले, रोहिदास पिसाळ, अर्जुन भोसले, मोहन भोसले, नितीन विसापुरे, यशराज भोसले, मनोज भोसले, मालन गायकवाड आदी उपस्थित होते. 

फलटण शहर : शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये भाजप व मित्र पक्षातर्फे दूध दरासाठी "रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून भाजप नेते व पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली "रास्ता रोको' आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, रासपचे जिल्हाध्यक्ष मामू वीरकर, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, जयकुमार शिंदे, अनिकेत कदम, भाजप शहराध्यक्ष उदय मांढरे, अभिजित निंबाळकर, सुशांत निंबाळकर, संजय पवार, बजरंग गावडे, अशोकराव भोसले, उषा राऊत, राहुल शहा, रासपचे खंडेराव सरक, ज्येष्ठ नेते काशिनाथ शेवते, संतोष ठोंबरे, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी आंदोलकांनी गोरगरिबांना दुधाचे वाटप केले. 

सुदृढ बाळासाठी स्तनपानाला प्रोत्साहन द्या

रशियापर्यंत पोचलेला फकीरा

खंडाळा : शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिंदे व कृष्णा दूध डेअरीसमोर घोषणा देऊन, तसेच गरीब कुटुंबातील मुलांना दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, नगरसेवक अनिरुद्ध गाढवे, दत्तात्रय गाढवे व साजिद मुल्ला, महिला तालुका अध्यक्षा वनिता शिर्के, प्रशांत खंडागळे, संतोष देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. भिलार नजीकच्या पाचगणी येथे मुख्य बाजारपेठेत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. डेअरी चालकांना निवेदन दिले. तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अजित सकपाळ, बाळासाहेब आंब्राळे, बाळासाहेब जाधव व इतर कार्यकर्त्यांनी हातात निषेधाची फलक घेऊन घोषणाबाजी केली. कोरेगाव येथे दूध दरवाढीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे येथे निदर्शने करण्यात आली. तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील हिंद भवन चौकात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दूध दरवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी करत यावेळी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT