सातारा

साताऱ्यात भाजपचा आक्रमक पवित्रा; राज्य सरकारचं परिपत्रक फाडलं!

प्रशांत घाडगे

सातारा : केंद्र सरकारने सर्वसामान्य शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी कृषी सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतला. परंतु, हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ नये यासाठी राज्य सरकारने परिपत्रक काढले असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यापासून दूर नेणारे हे परिपत्रक असल्याने शहर भाजपच्या वतीने परिपत्रक फाडून राज्य सरकारच्या निषेधार्थ साता-यात आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, भरत मुळे, नितीश कदम, किशोर गालफाडे, अमोल सणस, ऍड प्रशांत खामकर, सुनील कोळेकर, मनोज कलापट, प्रवीण शहाणे आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष विकास गोसावी म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेले शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, शेतमाल हमीभाव व शेती सेवा करार (सक्षमीकरण आणि संरक्षण) विधेयक आणि अत्यावश्‍यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन कृषी सुधारणा विधेयके म्हणजे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठीच्या दिशेने टाकलेले क्रांतिकारी पाऊल आहे. 

नव्या विधेयकात अन्नदात्या शेतकऱ्याला अनेक बंधनातून मुक्त केले असून त्यांना आपला शेतमाल विकण्यास अधिक स्वातंत्र्य व पर्याय उपलब्ध होणार आहेत. राज्यभरात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी सुधारणा कायद्यातील तरतुदी आणि त्यांचे शेतकऱ्यांना होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT