सातारा

महाविकास आघाडीचे भंपक सरकार उलथवा : चंद्रकांत पाटील

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : महाविकास आघाडीचा कारभार भंपकने सुरू आहे. घोषणा होताहेत उदंड अन्‌ कृती मात्र शून्य आहे. त्यामुळे सरकारबाबत सामान्यात राग आहे. तो व्यक्त करण्याची संधी पदवीधर, शिक्षक मतदारांना मिळाली आहे. त्या निमित्ताने सरकार धडा शिकवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख, शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. उमेदवार जितेंद्र पवार, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा परिषद सदस्या शामबाला घोडके, प्रियांका ठावरे, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ""पुणे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व अनेक वर्षे केले आहे. शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न, युवकांचा कौशल्य विकास व्हावा, यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय यशस्वीपणे अंमलात आणले. भाजपच्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावला. भाजपचे पदवीधरचे संग्राम देशमुख यांनाही समाजकारणाचा वारसा आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्यासह शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना पहिल्या पसंतीची मते देऊन निवडून आणावे.'' अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. या वेळी उमेदवार जितेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पैलवान धनंजप पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी देशमुख यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

Latest Maharashtra News Updates : महायुतीचं निर्विवाद वर्चस्व! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला

SCROLL FOR NEXT