Satara Lok Sabha Constituency esakal
सातारा

Devendra Fadnavis : कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात भाजपचाच खासदार हवा; NCP च्या बालेकिल्ल्यातून फडणवीसांचा आदेश

सातारा जिल्ह्यात भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) ताकद वाढविण्याची अजूनही गरज आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यात भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) ताकद वाढविण्याची अजूनही गरज आहे. त्यासाठी ‘नरेंद्र मोदी अॅट नाईन’ या अभियानांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत शासकीय योजना पोचवून पक्षाची संघटनात्मक बांधणी करा.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा भाजपचाच झाला पाहिजे, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कोअर कमिटीच्या बैठकीत केल्या, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यामध्ये ते बोलत होते.

खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रमुख अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, सातारा लोकसभा प्रभारी माजी खासदार अमर साबळे.

तसेच राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, भाजपचे मदन भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांच्यासह कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील सद्यःस्थिती आणि सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित कोअर कमिटी सदस्यांकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली.

सातारा जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांच्या काळात जे काम केले आहे, ते जनतेपर्यंत पोचले पाहिजे. त्यांनी सर्वसामान्यांसाठी, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्वांसाठीच ज्या योजना सुरू केल्या आहेत.

त्या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोचवाव्या. ज्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांना तो मिळवून द्यावा. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर द्या. पक्षाचे पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्यांनी पक्षासाठी जादाचा वेळ दिला पाहिजे.’’

कऱ्हाड दक्षिणसाठीही ठरली रणनीती

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे करत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून अतुल भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती.

मात्र, मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअनुषंगानेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत आढावा घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT