'शरद पवार यांच्यासह अनेकजण मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले. मात्र, एकानेही आरक्षणाविषयी एकही शब्द काढला नाही.'
बिजवडी : माण-खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचंय.. हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून ९५ गावांना पाणी जातेय. उत्तर माणमधील १६ गावांचे जिहे-कठापूरमधून काम सुरू आहे. कुकुडवाडसह ४४ गावांसाठी लवकरच सुप्रमा घेऊन त्याही गावांचा पाणी प्रश्न सोडवतोय. या २१ गावांचे काम चालू केल्याशिवाय येणारी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणार नाही, असा विश्वास आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी व्यक्त केला.
बिजवडी येथे उत्तर माणमधील २१ गावांना जिहे-कठापूरचे पाणी (Jihe-Kathapur Water Scheme) मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा घेण्यात आला होता, त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उत्तर माणच्या २१ गावांच्या वतीने जयकुमार गोरे यांच्यावरती जेसीबीने फुलांची उधळण करत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अरुण गोरे, अर्जुन काळे, दादासो काळे, हरिभाऊ जगदाळे, बाबासो हुलगे, सोमनाथ भोसले, संजय गांधी, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे, अक्षय महाराज भोसले, मामूशेठ वीरकर, तुकाराम भोसले, विठ्ठलराव भोसले, नवनाथ शिंगाडे, संजय भोसले, राजाराम बोराटे, दौलतराव जाधव, एकनाथ कदम, आदी उत्तर माण सर्व गावांतील प्रमुख, ग्रामस्थ तसेच माण तालुक्यातील विविध गावचे मान्यवर उपस्थित होते.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘२०१९ मध्ये आंधळी धरणातून उचलून या भागाला पाणी देणार, हा शब्द दिला होता. या योजनेचे भूमिपूजन करून कामही सुरू करून दाखवलेय. जुलै महिन्यापर्यंत हिंगणीला पाणी जातेय. या गावांचा या योजनेत समावेश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन योजना मंजूर केली.
ही योजना अंदाजे साडेपाचशे ते पावणेसहाशे कोटी रुपयांची आहे. २४ तास लबाडाच्या संगतीत राहणाऱ्यांना लबाडीच दिसणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना दिला. अर्जुन काळे, अक्षय महाराज भोसले, बाबासाहेब हुलगे, राजाराम बोराटे यांनी मनोगत व्यक्त केले. मामूशेठ वीरकर यांनी प्रास्ताविक केले. अॅड. ऋषिकेश भोसले यांनी आभार मानले.
मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी ऐतिहासिक आंदोलने करण्यात आली. मात्र, आजपर्यंत शरद पवार यांच्यासह अनेकजण मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले. मात्र, एकानेही आरक्षणाविषयी एकही शब्द काढला नाही; पण या समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता अन् आपलेच सरकार या मराठा, धनगर समाजबांधवांना आरक्षण देईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.