body of army Naib Subhedar Shankar Ukalikar was martyred in Leh at Karad sakal
सातारा

Satara : भारतमातेच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी आबालवृद्ध एकवटले

लेहमध्ये हुतात्मा झालेल्या नायब सुभेदार शंकर उकलीकर यांचे पार्थिव कराडला दाखल

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : अमर रहे अमर रहे....शहीद जवान अमर रहे..., वीर जवान तुझे सलाम.....भारत माता की जय..... वंदे मातरम या ना अशा घोषणा देत कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगडचे (ता.कऱ्हाड) नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) या भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो आबाल वृद्धबाल कराडला जमले होते.

कराडच्या विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वसंतगडला त्यांची अंत्ययात्रा काढून नेण्यात आले. शंकर उकलीकर यांचे प्राथमिक शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले.

त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. २००१ साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी २२ वर्ष सेवा बजावली होती.

त्यादरम्यान त्यांनी २००८ साली पुर्ण बर्फाच्छादीत शिखरावर चढण्याचा माऊंटींग कोर्स केला होता. त्यात त्यांना एक ग्रेड मिळाली होती. ते सध्या मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपमधील ११२ इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत होते.

तेथुन दिल्ली मुख्यालयातून कारगील क्षेत्रातील लेहमध्ये ४० जवानांना पाचारण करण्यात आले होते. बर्फाच्छादीत प्रदेशात कार्यरत असताना दुर्घटना होवुन नऊ जवान गाडले गेले आहेत. त्यातील तीघांचे मृतदेह सापडले आहेत.

त्यामध्ये नायब सुभेदार उकलीकर यांचा समावेश आहे. त्यामुळे वसंतगड गावावर शोककळा पसरली आहे. त्याचे पार्थिव तेथुन पुणे विमानतळावरुन आज शुक्रवारी कराड येथे आणण्यात आले. येथील विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर विजय दिवस समारंभ समिती आणि मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत प्रारंभ झाला तेथून ती पार्टी व त्यांच्या मूळ गावी वसंतगडला नेण्यात येणार आहे तेथून पुन्हा गावातून अंतयात्रा काढून पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येईल त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर वसंतगडाच्या पायथ्याशी अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या पश्चात पत्नी, आर्या ही सहा वर्षाची मुलगी, आई, भाऊ- भावजय असा परिवार आहे. गावच्या सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT