सातारा

सातारा जिल्ह्यातील 'या' गावात नववधू कोरोनाबाधित, 44 जण क्वारंटाइन

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि.सातारा) : चारच दिवसांपूर्वी लग्न झालेल्या साईकडे (ता. पाटण) येथील नववधूचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रिपोर्टकडे डोळे लावून बसलेल्या वऱ्हाडी मंडळींसह ग्रामस्थांच्या काळजीत भर पडली आहे. नवरी मुलीच्या माहेरकडील नातेवाइकांचे अहवाल यापूर्वीच बाधित आढळल्याने तिकडूनच हे संक्रमण झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, विभागातील निगडे येथील एका महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने दुर्गम भागातही कोरोना फैलावू लागल्याचे चित्र आहे.
 
साईकडे येथे प्राथमिक शाळेच्या पटांगणात मंगळवारी (ता. 7) झालेल्या विवाह सोहळ्यासाठी जावळी तालुक्‍यातील एका गावातून वधू पक्षाकडील वऱ्हाड आले होते. अनेक ग्रामस्थ व नातेवाईकही या वेळी उपस्थित होते. लग्नानंतर भोजनाचाही सर्वांनी आस्वाद घेतला. मात्र, वऱ्हाड आपल्या गावी निघून गेल्यानंतर तिकडील काही जण बाधित सापडल्याची बातमी साईकडेत येऊन धडकल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण पसरले. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने तातडीने हालचाली करून नवदांपत्यासह साईकडेतील संबंधित कुटुंबातील काही जणांना तळमावले येथील विलगीकरण कक्षात दाखल केले. दोनच दिवसांपूर्वी नववधूचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेला होता. रात्री उशिरा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नववधूला उपचारासाठी कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, लवकरच उर्वरित काही जणांचेही स्वॅब तपासणीस पाठवणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ""खबरदारी म्हणून गावातील 32 जणांना होम क्वारंटाइन, तर निकट सहवासातील 12 जणांना विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. काही जण मुंबईहून आल्याचेही समजल्याने माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.'' दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलिस पाटील विशाल कोळेकर, ग्रामसेवक श्री. नष्टे आदींसह ग्रामपंचायतीसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने साईकडेत धाव घेऊन आवश्‍यक उपाययोजना हाती घेतल्या.

गावाकडे जाणारा मुख्य रस्ता प्रवेशद्वारावरच बंद करण्यात आलेला आहे. ढेबेवाडी विभागातील डोंगर कपारीतील कसणी पाठोपाठ निगडे येथील एका महिलेचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने दुर्गम भागातही कोरोना फैलावू लागल्याचे चित्र आहे. निगडे येथील संबंधित 57 वर्षीय महिलेला ताप खोकल्याचा त्रास होत असल्याने तीन दिवसांपूर्वीच तिला उपचारासाठी कऱ्हाडच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या निकट सहवासितांना तळमावलेतील विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

दहिवडीतील तरुणांमुळे पोलिसांनी खटाव तालुक्यातील चोरट्यास पकडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT