सातारा

तुमचे सिम कार्ड बंद हाेईल असा SMS येत असेल तर Reply देऊ नका; BSNL चे जागाे ग्राहक जागाे अभियान

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार वाढत आहे. सरकारकडून अनेक वेळा वारंवार सूचना करुनही इशारा अनेल लाेक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एल-बँकिंग फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे आहे, जे मुख्यतः शासकीय दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएलच्या (BSNL) ग्राहकांना फसवित आहे. सध्या बीएसएनएल ग्राहकांना एक एसएमएस येत आहे, कागदपत्र जमा करा अन्यथा तुमचे सिम कार्ड बंद हाेईल. खरंतर हा संदेश बीएसएनलकडून पाठविला जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी एसएमएसला उत्तर देऊ नये. तुमची गोपनीय माहिती शेअर करू नका आणि फसवणुक टाळा असे आवाहन बीएसएऩएलने केले आहे. 

या एसएमएसद्वारे फसवणूक करणार्‍यांनी केवायसी तपशिलासह ग्राहकांकडून पैसे चोरण्यासाठी ही चाल चालविली आहे. कधी कधी बीएसएनएल ग्राहकांना पुन्हा फोनवर केवायसी तपशील जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला जाताे. बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना केवायसी तपशील केवळ एसएमएसद्वारेच नव्हे तर फोन कॉलद्वारे जाणून घेतला जात आहे. ग्राहकांना दूरध्वनी करुन, आम्ही बीएसएनएल कस्टमर केअरमधून बोलत आहोत. आपण आपले केवायसी तपशील शेअर केला नाही तर तुमचे सिम कार्ड बंद हाेऊ शकते असे सांगितले जाते. यामुळे काही ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांच्याकडून माहिती गाेळा झाल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून रक्कम काढली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

दरम्यान बीएसएनएलकडून काेणतेही फाेन काॅल्स जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे संदेश सायबर गुन्हेगार पाठवित आहेत. तुम्हांला येत असलेल्या एसएमएसमध्ये कंपनीचे नाव तसेच सहा वर्णांचे हेडर किंवा प्रेषक असतात ‘सीपी-एसएमएसएफएसटी, एडी-व्हीआयआरआयएनएफ, सीपी-बीएलएमकेएनडी आणि बीपी-आयटेलिन’ हेडरोसह संदेश येतात. ग्राहकांनी असे एसएमएस टाळावेत असे आवाहन बीएसएनएलने केले आहे. अशा खाेट्या संदेशांच्या जाळ्यात फसू नका. आपल्या खात्यातून माेठी रक्कम जाऊ शकते. अशा परिस्थितीत बीएसएनएल कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही असेही सूचित करण्यात आले आहे.

अशी केली जाते फसवणूक

फ्राॅड करणारे लोक बीएसएनएलचा कर्मचारी असल्याचे सांगून करतात कॉल

केवायसी डिटेल्स नसल्याचे सांगून तुमचे सीम कार्ड बंद हाेऊ शकते असे सांगतात. 

फ्राॅड करणारे ग्राहकाच्या बॅंक खात्यातून पैसे काढण्यासाठी एसएमएसच्या माध्यमातून केवायसी डिटेल्सचा करतात वापर. 

हे करा

CP-BLMKND, CP-SMSFST, BP-ITLINN आणि AD-VIRINF अशाप्रकारे येणाऱ्या मेसेजला देऊ नका रिप्लाय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT