Artist esakal
सातारा

कुणी लस देता का, लस या तुफानाला?; कलावंतांनी व्यक्त केली खंत

सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : या कोरोनाच्या (Coronavirus) काळात कला गेली, कलाकारही (Artist) गेला. अभिनेत्यासोबत (Actor) कामगारही गेला. किती आवरायचे, किती सावरायचे, घरातल्या घरात किती झुरायचे... निःशब्द करून टाकणारे हे प्रातिनिधिक स्वगत आहे, ग्रामीण भागातील एका वेबसिरीज कलावंताचे. (Cameraman And Spotboy In Trouble Due To Lockdown Coronavirus)

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे जगण्याची सारी गणितेच बिघडून गेली आहेत. जनजीवन ठप्प आहे. साऱ्यांनाच त्याची झळ सहन करावी लागत आहे.

कोरोना ठाण मांडून आहे. त्याला आता जवळपास सव्वा वर्ष उलटून गेले आहे. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे जगण्याची सारी गणितेच बिघडून गेली आहेत. जनजीवन ठप्प आहे. साऱ्यांनाच त्याची झळ सहन करावी लागत आहे. शेतीपासून उद्योगापर्यंत सारीच क्षेत्रे ढासळलेल्या परिस्थितीला तोंड देत आहे. कलेच्या क्षेत्रात कार्यरत असणारी ग्रामीण भागातील कलावंत मंडळीही त्याला अपवाद नाहीत.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील युवा वर्ग मोठ्या संख्येने या क्षेत्राकडे वळला आहे. भारी किमतीचे कॅमेरे, चित्रीकरण, निर्मिती, एडिटिंगसाठी आवश्‍यक साहित्य अनेकांनी खरेदी केले आहे. वेबसिरीज (Web Series), शॉर्ट फिल्म (Short film), विवाह सोहळे, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम अशा माध्यमातून हा वर्ग एरवी सतत व्यस्त असायचा. आता लॉकडाउनमुळे हे सारे थांबले आहे. त्यातून फोटोग्राफरांपासून कलावंतांपर्यंत सारेच अडचणीत आले आहेत. त्यांची व्यथा अंगापूर (ता. सातारा) येथील कलावंत अंकुश कणसे यांनी एका शॉर्टफिल्ममध्ये मांडली आहे.

"कुणी लस देता का, लस या तुफानाला? स्पॉटबॉयच्या (Spotboy) सहवासावाचून, लाइटमनच्या प्रकाशावाचून, कॅमेरामनच्या रोलिंगवाचून, डायरेक्‍टरच्या ऍक्‍शनवाचून एक तुफान अडकलंय लॉकडाउनच्या साखळदंडात. कुणी लस देता का, लस या तुफानाला?' हे या शॉर्टफिल्ममधील स्वगत पाहणाऱ्याला निःशब्द करून सोडते. त्या निमित्ताने ग्रामीण भागातील कला क्षेत्रातील मंडळींची वेदना तीव्रतेने जगासमोर आली आहे.

ग्रामीण भागातील तरुणांनी कर्जे काढून कॅमेरे, तंत्रज्ञानादी साहित्यात पैसे गुंतविले आहेत. बहुतेकांची उपजीविका त्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच्या निराकरणासाठी उपाय शोधणे आवश्‍यक आहे.

-अंकुश कणसे, सचिव, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन, सातारा

Cameraman And Spotboy In Trouble Due To Lockdown Coronavirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT