Campaign to remove encroachments continues एोकोत
सातारा

लोणंदला अतिक्रमणे हटाव मोहीम सुरूच

पालखी मार्गासह तळाचा परिसर झाला मोकळा; २५० टपऱ्यांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा

लोणंद - शहरात आज दुसऱ्या दिवशीही तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाने चोख पोलिस बंदोबस्तात दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. पालखी तळाचा परिसर व पालखी मार्गावरील २०० ते २५० टपऱ्या, शेड, दुकानसमोरच्या पायऱ्या, कठडे, छोटे- मोठे फलक जेसीबीने जमीनदोस्त केले. त्यामुळे पालखी मार्ग व पालखी तळाचा परिसर पूर्णपणे मोकळा झाला आहे.

आज सकाळी ९ वाजल्यापासून या मोहिमेस प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. तहसीलदार काळे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पांडुरंग मस्तूद, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी, नगरपंचायतीचे सहायक नगररचनाकार दिनेश नेरकर, नगर अभियंता सागर मोटे, कार्यालयीन अधीक्षक शंकरराव शेळके, रोहित निंबाळकर, विजय बनकर यांच्यासह २० ते २५ कर्मचारी, लोणंदच्या मंडलाधिकारी रूपाली यादव, तलाठी श्रीकांत डटलोड, पिंकी वाझे, जोतिराम दगडे, चंद्रकांत जाधव, विठ्ठल कुंभार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता आशिष कर्वे, तसेच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते.

आज सकाळी ९ वाजता तहसीलदार काळे व मुख्याधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीत दोन जेसीबी, २ क्रेन, तीन ट्रॅक्टर, तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या पथकाने पालखीतळावरील स्वामी समर्थ मठाच्या परिसरातील, तसेच राजलक्ष्मी सिनेमागृहाकडे जाणारा रस्त्यावरची अतिक्रमणे हटविली. त्यानंतर खंडाळा रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील, नवी पेठ, शास्त्री चौक, लोणंद- सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील, गणपती मंदिर व साईबाबा मंदिर परिसर, बस स्थानकासमोरच्या जुन्या शासकीय दवाखान्याच्या जागेवरील, तसेच शिरवळ रस्ता येथील २०० ते २५० अतिक्रमणे हटविली. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्याही जेसीबीने काढण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

Will Jacks Video: RCB चा शतकवीर मुंबई इंडियन्सने घेतला अन् आकाश अंबानी बंगळुरूच्या संघमालकांना थँक्यू म्हणून आला

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT