सातारा : मंत्रालयात नोकरीस असल्याचे सांगत शिरंबे (ता. कोरेगाव) येथील युवकास पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या (Pune District Collector) सहीचे बनावट नियुक्तीपत्र देत दीड लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात (Shahupuri Police Station) अनिता देवानंद भिसे (रा. पुणे) हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शिरंबे (ता. कोरेगाव) येथे आकाश भीमराव हुंबे राहण्यास आहेत. ते वाढेफाटा येथे सुरू असणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पात साईट सुपरवायझर म्हणून कामास आहेत. याठिकाणी अनिता देवानंद भिसे या फ्लॅट खरेदीसाठी आल्या होत्या. वारंवार येत असल्याने भिसे आणि हुंबे यांची ओळख झाली. (Case Registered Against Woman From Pune At Shahupuri Police Station In Fraud Case bam92)
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे बनावट नियुक्तीपत्र देत दीड लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनिता भिसे हिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ओळखीनंतर भिसे यांना मी मंत्रालयात नोकरीस असून, तुला शासकीय नोकरी मिळवून देते, असे सांगितले. यानुसार २०१८ पासून हुंबेने भिसे हिला दीड लाख रुपये दिले. यानंतरच्या काळात भिसे हिने हुंबे याला हवेली तहसील कार्यालयात नेमणूक झाल्याचे पत्र दिले. या पत्रात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्यासाठीची तारीख नमूद करण्यात आली होती. यानुसार हुंबे हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune District Collector's Office) गेले. याठिकाणी जाण्यापूर्वी त्यांनी भिसेला फोन केला. फोन केल्यानंतर भिसे त्याला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात भेटल्या. हुंबेकडील नियुक्तिपत्र काढून घेत साहेबांना भेटून येते, असे सांगत भिसे त् याठिकाणाहून निघून गेली. थोड्या वेळानंतर भिसे पुन्हा त्याठिकाणी आली व तिने शिपाईपदासाठी नियुक्ती झाली असून, त्याचा नेमणूक कालावधी सुरू होण्यास अवधी असल्याचे पुणे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र हुंबेला दिले.
यानुसार पुन्हा हुंबे हजर होण्यासाठी गेले असता, साहेब बाहेर आहेत सांगत भिसेने वैद्यकीय तपासणी अहवाल, सेवापुस्तिका व इतर बाबींची कागदपत्रे देत तशी तपासणी पुण्यातील गंजपेठेत असणाऱ्या डॉ. भारत शहा यांच्याकडून करून घेतली. भिसे वारंवार टाळाटाळ करू लागल्याने हुंबे यांना संशय आला. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी चौकशी केली असता देण्यात आलेले नियुक्तिपत्र बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हुंबे यांनी भिसेंकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, तिने पैसे परत देण्यास नकार दिला. याप्रकरणी आकाश हुंबे यांनी शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली. यानुसार अनिता भिसे हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फसवणुकीचे अनेक गुन्हे
हुंबे यांनी भिसे हिच्याविषयी मंत्रालयात जावून चौकशी केली. चौकशीत भिसे हिने अनेकांना अशा प्रकारे गंडा घातला असून, त्याबाबतचे अनेक गुन्हे पुणे तसेच इतर पोलिस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती भिसे यांना मिळाली.
Case Registered Against Woman From Pune At Shahupuri Police Station In Fraud Case bam92
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.