Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh esakal
सातारा

वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, मेटल डिटेक्टर, CCTV कॅमेरे अन् मोठा पोलिस बंदोबस्त; किती महिने पाहता येणार वाघनखं?

ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ही वाघनखे बुधवारी सकाळी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली व तेथून सातारा पोलिस व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुपारी साताऱ्यात आणण्यात आली.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे (Wagh Nakh) मुंबईहून साताऱ्यात काल (बुधवार) दुपारी विशेष सुरक्षेत दाखल झाली. ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत.

या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेट प्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत, तसेच पोलिस (Satara Police) व बाहेरच्या एजन्सीकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही वाघनखे सात महिने सातारकरांना पाहता येणार आहेत.

शुक्रवारी (ता. १९) दुपारी सव्वाबाराला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील शौर्याचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत.

ही वाघनखे बुधवारी सकाळी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली व तेथून सातारा पोलिस व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुपारी साताऱ्यात आणण्यात आली. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत. तब्बल सात महिने ही वाघनखे येथे लोकांना पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी ती बुलेट प्रूफ काचेच्या पेटीत ठेवण्यात येणार असून, त्यांच्या सुरक्षिततेचा काळजी घेण्यात आली आहे. इंग्लंडहून विशेष विमानाने वाघनखे महाराष्ट्रात आली. तेथून ती विशेष सुरक्षेत साताऱ्यात दाखल झाली.

शुक्रवारी होणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभास खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. शनिवारपासून (ता. २०) हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियमच लंडनचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड हे देखील सोबत असतील. या वाघनाखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आला असून, तो वाघनखांची सर्व ती काळजी घेणार आहे. या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये बुलेट प्रूफ काचपेटी, मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर यासोबतच मॅन्युअल सुरक्षा यंत्रणाही तैनात असेल. सुरक्षिततेच्या कारणास्तव या वाघनखांची मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या वाघनखांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सुरुवातीला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम सुरू होईल. दुपारी सव्वाबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संग्रहालयात कार्यक्रम होईल. यावेळी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल तिकिटांचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT