Child Labor at Songaon Garbage Depot Video footage viral Neglect of municipality satara esakal
सातारा

Satara News : सोनगाव कचरा डेपोत बालकामगार

चित्रफिती व्हायरल : पालिकेचे दुर्लक्ष, संबंधित यंत्रणेने पुनर्वसनासाठी घ्यावा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहर व परिसरातील संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होणाऱ्या सोनगाव डेपोत बालकामगारांचा राबता असल्‍याचे समोर येत आहे. बालकामगारांच्‍या माध्‍यमातून तेथील कचऱ्यातून भंगार गोळा करण्‍यात येत असल्‍याच्‍या चित्रफिती समाज माध्‍यमांतून व्हायरल झाली आहे.

त्याची दखल घेत पालिका प्रशासन, महिला व बालकल्‍याण विभाग, तसेच बालकामगारविरोधी पथकाने त्‍याठिकाणची तपासणी करत बालकामगारांच्‍या पुनर्वसनासाठी पुढाकार घेणे आवश्‍‍यक आहे. सोनगाव येथील कचरा डेपोत पालिकेच्‍या वतीने संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्‍यात येते. यासाठीची यंत्रणा पालिकेने ठेकेदाराच्‍या मार्फतीने त्‍याठिकाणी उभारली आहे.

गेले काही महिने या यंत्रणेच्‍या माध्‍यमातून कचरा विलगीकरणाचे काम करण्‍यात येत होते. हे काम नंतरच्‍या काळात इंदूर येथील ठेकेदाराने थांबवत तो ठेका प्रशासनाच्‍या मदतीने पुणे येथील एका संस्‍थेकडे हस्तांतरित केला. ठेका हस्‍तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर पुणे येथून काही कुटुंबे याठिकाणी दाखल झाले. या कुटुंबातील सदस्‍यांच्‍या मदतीने कचऱ्यातील भंगाराचे संकलन करण्‍याचे काम गेल्या काही दिवसांपासून अखंडपणे सुरू आहे.

या कामासाठी मोठ्या प्रमाणात बालकामगार गुंतल्‍याचे समोर येत आहे. कचऱ्यासह जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयातून येणारा सुका व इतर कचऱ्याच्‍या प्‍लॅस्‍टिकच्‍या काळ्या पिशव्‍या फाडून भंगार, पुष्‍ठा, रिकाम्‍या पाण्‍याच्‍या बाटल्‍या व इतर साहित्‍य त्‍यांच्‍या मार्फतीने संकलन सुरू आहे. बालकामगारांसह त्‍याठिकाणी काम करणाऱ्या इतरांना कामादरम्‍यान कोणतीही सुरक्षेची साधने पुरविण्‍यात आली नसल्‍याचे समाज माध्‍यमात फिरणाऱ्या एका चित्रफितीतून दिसून येत आहे.

गेले काही महिने सातारा पालिका प्रशासन, आरोग्‍य विभाग, ठेकेदार, त्‍याची कार्यपद्धती आणि त्‍याठिकाणच्‍या भंगारमधील अर्थकारण याविषयीचे अनेक प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहेत. या प्रश्‍‍नांना बगल देत वेळ मारून नेण्‍यात सर्वच प्रशासकीय यंत्रणा धन्‍यता मानत असल्‍याने डेपोतील कामगारांसह परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्‍य धोक्‍यात येत आहे.

नियमांची राजरोस पायमल्ली...‍

बाल कामगारांना कामावर ठेऊ नये, यासाठीचे अनेक शासकीय नियम आहेत. अनेक ठिकाणी त्‍या नियमांची सर्रास पायमल्‍ली होत असल्‍याचे राजरोस दिसून येत आहे. बालकामगारांना त्‍या कामांपासून परावृत्त करत त्‍यांचे होणारे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक शोषण रोखण्‍यासाठी पालिका प्रशासनासह इतर शासकीय यंत्रणांनी डेपो परिसरासह भंगार संकलनाच्‍या कामात गुंतलेल्‍यांचा शोध घेण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT