Covid Center esakal
सातारा

साताऱ्यात 'Covid Center'ला नागरिकांचा विरोध; परवाना रद्द न केल्यास आंदोलन

साताऱ्यातील सोमवार पेठेत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

गिरीश चव्हाण

सातारा : शहरातील सोमवार पेठेत उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला (Covid Center) त्या परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवला असून त्याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. (Citizens Oppose Covid Center in Satara)

सोमवार पेठेतील एका हॉस्टिलमध्ये उभारलेले कोविड सेंटर हे मध्यवस्तीत असून त्याठिकाणी आवश्‍यक त्या उपाययोजना व मुलभूत सोयीसुविधा नाहीत. या हॉस्पिटलकडे रुग्णवाहिका नसून त्याठिकाणी बाधितांवर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष नाहीत. पोषक आहार, समुपदेशन, निर्जंतुकीकरण, धनकचरा व्यवस्थापन, जैववैद्यकीय कचरा यांचे व्यवस्थापन देखील याठिकाणी नसल्याचे नागरिकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या हॉस्पिटलसाठी पार्किंग व्यवस्था नसून धोकादायक स्थितीत त्याठिकाणी ऑक्‍सिजन सिलिंडर ठेवण्यात आली आहेत.

आग प्रतिबंधक उपाय योजना याठिकाणी नसून हॉस्पिटलच्या मुळ आराखड्यात बेकायदेशीरपणे बदल करण्यात आले आहेत. मंजुर रुग्णसंख्येपेक्षा याठिकाणी जास्त रुग्ण असून आपत्कलिन उपाय योजना येथे नसल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. याच अनुषंगाने झालेल्या वादानंतर हॉस्पिटल व्यवस्थापनाने स्थानिकांच्या विरोधात शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निवेदनात नमूद केलेल्या बाबींची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली असून कोविड सेंटरचा परवाना रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिकांनी निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.

Citizens Oppose Covid Center in Satara

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT