Corona Vaccine esakal
सातारा

Good News : वित्त आयोगाच्या व्याजाच्या पैशातून नागरिकांना मिळणार मोफत लस!

रहिमतपुरात सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याबाबत महत्वाचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक मुखाने घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

रहिमतपूर (सातारा) : येथील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस (Corona Vaccine) देण्याबाबत महत्वाचा निर्णय पालिकेचा सर्वसाधारण सभेत एक मुखाने घेण्यात आला. सकाळी 11.30 वा.च्या सुमारास नगरपालिकेची विशेष सभा पालिका सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे (Ananda Kore) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव व त्याचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी चर्चां करण्यात आली. (Citizens Will Get Free Corona Vaccine In Rahimatpur Satara News)

यावर सुनील माने यांनी 14 वित्तयोगाच्या व्याजाच्या पैशातून कोरोना लसींची खरेदी करण्याचा विषय मांडला. या विषयावर सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. कोरोना लस खरेदी ही बाब रहिमतपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची असून त्याबाबत संबंधित विभागाची मंजुरी घेऊन लवकरात-लवकर ही लस शहरातील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येईल, असे नगराध्यक्ष आनंदा कोरे यांनी यावेळी सांगितले. त्याच बरोबर रहिमतपूर कोरोना केअर सेंटरसाठी ज्यांनी मदत केली, त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच विविध योजनाअंतर्गत प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यास मान्यता देण्यात आली असून या प्रमाणे विविध सहा विषयांना मंजूर देण्यात आलीय.

भारताची लसीकरण मोहीम अपयशी ठरलीय? वाचा काय आहेत नेमकी कारणं

Citizens Will Get Free Corona Vaccine In Rahimatpur Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT