राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. मात्र महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी मंत्रिमंडळ विस्तार खोळंबला होता. अखेर मुहुर्त लागला आणि शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता प्रतिक्षा आहे खातेवाटपाची. ते कधी होणार? याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे. (CM Eknath Shinde on Cabinet Expansion)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी साताऱ्यातल्या आपल्या मूळ गावी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना भाजपा युतीच्या सरकारबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, माणूस कधी आपलं मूळ विसरत नाही. हे मूळ आहे. इथली माणसं जिवाभावाची आहेत. या भागासाठी विकासात्मक गोष्टी आम्ही नक्की करू. शिवसेना भाजपा युतीचं सरकार आता स्थापन झालंय. देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्री राज्याचा विकास करतीलच. त्यासोबत ही निसर्गसंपदा आहे, इथं पर्यटनाला वाव आहे. त्याला चालना देण्याचंही काम करू.
खातेवाटपाविषयी बोलताना CM शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असं विचारलं जात होतं. तो झाला. त्याप्रमाणे आता खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी होतील. त्या वेळेवरच होतील. पण आम्ही कुठेही विकासाची कामं थांबू दिलेली नाहीत. कालच आम्ही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानावर भरघोस अशी मदत दिलीय. एनडीआरएफच्या नियमाच्याही दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. २ हेक्टरची मर्यादा होती, ती वाढवून तीन हेक्टर केलीय, असे अनेक निर्णय आम्ही महिन्याभराच्या काळात घेतलेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.