Karad Municipality esakal
सातारा

कऱ्हाडचा फेर अर्थसंकल्पही अडकणार; मुख्याधिकाऱ्यांची समन्वयकाची भूमिका!

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी कऱ्हाडच्या फेर अर्थसंकल्पाचा (Karad Municipality Budget) अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने पालिका अधिकाऱ्यांकडून तो तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief officer Ramakant Dake) यांनी त्यासाठी समन्वयाची भूमिका घेतली आहे. मात्र, पालिकेच्या पातळीवर अर्थसंकल्पाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने तीन दिवसांत त्या अहवालावरही प्रश्नचिन्ह आहे. (Collector Shekhar Singh Instructions To Submit Karad Municipal Corporation Budget Report Satara Marathi News)

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याविरोधात जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी उपोषण केले आहे.

पालिका अर्थसंकल्पावर काहीही निर्णय झालेला नसल्यासह नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांच्याविरोधात जनशक्ती आघाडीचे गटनेते (Janshakti Aghadi) राजेंद्र यादव यांनी उपोषण केले. मात्र, जिल्हाधिकारी सिंह व मुख्याधिकारी डाके यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाने त्यांनी उपोषण स्थगीत केले. मुख्याधिकारी डाके यांना फेर अर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी लेखी अश्वासनात केल्या आहेत. तो अहवाल तीन दिवसांत देण्याच्या सूचना केल्या असून, नऊ जुलैपर्यंत त्यास मंजुरी देण्याचे आश्वासनही दिले आहे. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव (Janshakti leader Rajendra Yadav) यांच्या उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पालिकेचे अधिकारी अंमलबजावणी करत आहेत. त्या संबंधाने मुख्याधिकारी डाके यांनाही काही कागदपत्रांची पाहणी केली. अधिकारी समन्वयाची भूमिका घेत आहेत.

मात्र, राजकीयदृष्ट्या होणारे आरोप व त्यांनी केलेल्या प्रतिष्ठेच्या मुद्द्याची त्यांना अडचण होत आहे. त्यामुळे फेर अर्थसंकल्प देण्याचा आज (शनिवारी) तिसरा दिवस आहे. त्या दिवशी तरी पालिकेतून अहवाल जाणे अपेक्षित आहे. मात्र, तो जाणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे नऊ जुलैपर्यंत पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल, असे दिसत नाही. याबाबत गटनेते यादव म्हणाले, ‘‘नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी एका अहवालात अर्थसंकल्प बहुमताने, तर दुसऱ्या अहवालात नजरचुकीने बहुमताने मंजूर असा उल्लेख झाल्याचा उल्लेख नमूद करून तो अर्थसंकल्प एकमताने मंजूर झाल्याचा त्या नमूद करत आहेत. त्या सरळ सरळ खोटे बोलत आहेत. ती शासन, पालिका सभागृह, पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी आग्रही आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी सिंह यांनी दिलेल्या आश्वासनापर्यंत अर्थसंकल्प मंजूर झाला पाहिजे, यावर आम्ही ठाम आहोत. अन्यथा पुन्हा उपोषणास बसावे लागेल.’’

Collector Shekhar Singh Instructions To Submit Karad Municipal Corporation Budget Report Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT