सातारा : तिसऱ्या लाटेची संभाव्यता गृहीत धरून बालकांच्या सुरक्षिततेसाठी ‘माझे मूल माझी जबाबदारी’ (My Child My Responsibility Scheme) या योजनेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाधितांची शनिवार ते शुक्रवार अशी आकडेवारी संकलित करून संक्रमणाची टक्केवारी निश्चित केली जाणार आहे. याचबरोबर गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या (Corona Patient) संख्येचा आलेख घटत चालल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी स्पष्ट केले. (Collector Shekhar Singh Said That It Was The Responsibility Of The People Of District To Control The Spread Of Corona)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संक्रमणाचा लहान मुलांना त्रास होऊ नये याकरिता सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या चार तालुक्यांत लहान मुलांसाठी तीस ऑक्सिजन बेडची रुग्णालये उभारली जात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सिंह बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (Superintendent of Police Ajaykumar Bansal), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. याबाबत श्री. सिंह म्हणाले, ‘‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संक्रमणाचा लहान मुलांना त्रास होऊ नये याकरिता सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या चार तालुक्यांत लहान मुलांसाठी तीस ऑक्सिजन बेडची रुग्णालये उभारली जात आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सूचनेप्रमाणे 0 ते 2 बालकांसाठी मास्क न वापरणे, 2 ते 5 वयोगटाच्या बालकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त करणे व 5 वर्षांपुढील बालकांना मास्कची सक्ती करणे ही नीती अवलंबिली जाणार असून, त्या पद्धतीने पालकांना समुपदेशन करणाऱ्या चित्रफिती प्रदर्शित करणार आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणे ही जिल्हावासियांची जबाबदारी आहे. तसेच, सर्व आरोग्य यंत्रणेकडून येणाऱ्या आकडेवारीचे काटेकोर संकलन केले जात आहे."शुगर आहे?...तुम्हाला लस नाही! ज्येष्ठ नागरिक लशीपासून वंचित
https://www.esakal.com/satara/health-department-avoid-vaccination-citizens-with-blood-pressure-diabetes-satara-marathi-news
लसीकरणाबाबत (Vaccination) जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘येत्या दोन दिवसांत खासगी दवाखान्यातील (Private Clinic) लसीकरणाच्या दराबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे नाममात्र शुल्कात लस दिली जाणार आहे. याचबरोबर कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात आयसीयू (ICU) व ऑक्सिजन बेडची (Oxygen Bed) क्षमता पाच हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असून, जिल्ह्याची ४८ मेट्रिक टन ऑक्सिजनची पूर्तता करणारे ऑक्सिजन प्लांट उभारणे, कॉन्सन्ट्रेटरचा मुबलक पुरवठा ठेवणे आदी उपाययोजना युद्ध पातळीवर राबविल्या जात आहेत." गेल्या वर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या फीबाबत अनेक शाळांनी पालकांना फी भरण्याची मागणी केली आहे. याबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे श्री. सिंह यांनी स्पष्ट केले.
शुगर आहे?...तुम्हाला लस नाही! ज्येष्ठ नागरिक लशीपासून वंचित
Collector Shekhar Singh Said That It Was The Responsibility Of The People Of District To Control The Spread Of Corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.