माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात काँग्रेस पक्ष भक्कम स्थान टिकवून आहे.
ढेबेवाडी (सातारा) : काँग्रेस पक्षाची (Congress Party) पाटण तालुक्यातील (Patan Taluka) निर्णायक ताकद सर्वांनाच माहिती आहे. येत्या जिल्हा परिषद (Zilla Parishad Election) व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार काँग्रेस ताकदीनिशी उतरून पुन्हा एकदा ताकद दाखवून देईल, असे काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील (Hindurao Patil) यांनी सांगितले.
पाटण तालुका काँग्रेस समितीची सभा हिंदुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथे झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेस समितीचे सचिव अभिजित पाटील, तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, डॉ. संतोष कदम, विलास सपकाळ, बबनराव सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद घाडगे, ॲड. राजन भिसे, रतन चव्हाण, विठ्ठल पाचुपते, प्रवीण पाटील, सतीश काळे, नारायण चव्हाण, आनंदराव नांगरे, बाळासाहेब साळुंखे उपस्थित होते. हिंदुराव पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेसचे विचार आणि ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोचण्याची गरज आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी काम करावे. पक्ष जो आदेश देईल, त्या पद्धतीने तालुक्यात काँग्रेस पक्षाची दिशा ठरेल.
पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संघटितपणे काम करून पक्षसंघटना मजबूत करूया. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात काँग्रेस पक्ष भक्कम स्थान टिकवून आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे सर्वांनी काम करूया. पदाधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून पक्षनिष्ठेला प्राधान्य देणे गरजेचे असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची सभासद नोंदणी करावी, असेही पाटील म्हणाले. पांडुरंग यादव, डॉ संतोष कदम, राजेंद्र चव्हाण, अरविंद घाडगे, विलास सपकाळ, राजन भिसे, आनंदराव नांगरे, बबनराव सूर्यवंशी, विठ्ठल पाचुपते, अभिजित पाटील आदींची भाषणे झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.