Khambatki Ghat Accident 
सातारा

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात भीषण अपघात! ब्रेकफेल झालेल्या कंटेनरने सात गाडयांना उडवले: तिघे गंभीर जखमी

अशपाक पटेल

खंडाळा .ता . २२ : सातारा - पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील धोकादायक वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात येणाऱ्या या गाडीने एकूण सात गाड्यांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये गाडयांचे मोठे नुकसान झाले असून, या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले तर किमान सहा ते सात जण किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र सुदैवाने जीवीतहानी झाली नाही ही घटना आज रविवारी दुपारी घडली .

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी दुपारी बोगदा ओलांडल्यानंतर तीव्र उतारावर असणारा ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाचे लक्षात आले. यावेळी चालकाने एक सारखे हॉर्न वाजवत गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उतारामुळे गाडीचा वेग ही वाढल्याने सात गाड्यांना उडवले. यामध्ये रिक्षासह सहा मोटार गाड्यांचा समावेश आहे. रिक्षासह सर्व गाड्यांचे मोठ मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

रमेश शामराव पाटील व राज रमेश पाटील बापलेक राहणार वाकुर्डे तालुका शिराळा जिल्हा सांगली व सजल गिरीराज शर्मा राहणार पुणे हे तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: विधानसभेआधी शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी, अजितदादांचं टेन्शन वाढणार!

मजुराच्या पोटी जन्म, मेहनतीने राजकारणात नाव कमावलं, आता बनले श्रीलंकेचे राष्ट्रपती, कोण आहेत अनुरा कुमारा दिसानायके?

Chess Olympiad 2024: भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक! महिला-पुरुष दोन्ही संघ ठरले 'अव्वल'

Latest Maharashtra News Live Updates: वेस्टर्न रेल्वेवर 23 आणि 24 सप्टेंबरला ब्लॉक

Buldhana Accident : सिमेंटचे खांब घेऊन जाताना काळाचा घाला! ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; दोन मजूर ठार,तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT