Rahimatpur Society Election 2021 esakal
सातारा

निवडणुकीत सहकार पॅनेलकडून शेतकरी पॅनेलचा धुव्वा

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीत मानेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलनं सर्वच जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय.

रहिमतपूर (सातारा) : रहिमतपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या (Rahimatpur Co-operative Services Society) निवडणुकीत सुनील माने यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने सर्वच १३ जागांवर विजय मिळवून प्रथमच आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी संस्थापक शेतकरी पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.

सहकार पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने (Sunil Mane), पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक अविनाश माने, माजी संचालक नंदकुमार माने, शिवसेना तालुकाध्यक्ष किरण भोसले यांनी केले. विजयानंतर गावात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून विजयी उमेदवारांचा विजय साजरा केला गेला.

सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : दिलीप खंडू पवार ८८३, सतीश भोसले ८९९, लहूराज यशवंत माने ८७८, विकास गणपती माने ९४१, विक्रम व्यंकटेश माने ९८१, शिवदास दिनकर माने ९६५, शिवाजी बाबूराव माने ९२५, शेखर चंद्रकांत माने ९१२, अनिल बापूराव जाधव १०२१, गोरख गायकवाड १०१२, रघुनाथ ज्ञानदेव शेरकर ९९९, शुभांगी अशोक माने ९८५, सुलोचना आनंदराव माने ९७०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT