Coronavirus esakal
सातारा

चिंता वाढली! माणमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सहाशेपार

कोरोना उपचार केंद्रे बंद झाल्याने मोजक्याच सुरू असलेल्या केंद्रांवर ताण

रूपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण तालुक्यात (Maan Taluka) मागील काही महिन्यांत घट झालेल्या कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. सध्या ही संख्या ६५४ इतकी झाली आहे. त्यातच महत्त्‍वाच्या कोविड सेंटरसह गावोगावी सुरू झालेली कोविड सेंटर (Covid Center) बंद झाल्याने काही मोजक्याच कोविड सेंटरवर ताण येऊ लागला आहे. होम आयसोलेशन (Home Isolation) हा प्रकार अचानक वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे डोकेदुखी ठरू लागला आहे.

माण तालुक्यात मागील काही महिन्यांत घट झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यात दहिवडी व म्हसवडसह पळशी, कुळकजाई, वारुगड, आंधळी, वडगाव, पांगरी, मार्डी, जाशी, शेवरी, धुळदेव, हिंगणी, गोंदवले बुद्रुक, सुरुपखानवाडी, जांभुळणी, पळसावडे, देवापूर, महाबळेश्वरवाडी व शेनवडी येथे दोन आकडी रुग्णसंख्या आहे. तालुक्यातील एकूण ९७ गावांमधील ६५४ कोरोनाबाधित उपचाराखाली आहेत. पळशीसारख्या गावात कोरोनाबाधितांची संख्या कायमच लक्षणीय राहिली आहे. अशा गावांनी एकावेळी हॉटस्पॉट व मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेल्या बिदालचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. आज बिदालमध्ये फक्त सहा कोरोनाबाधित असून, विलगीकरण धोरण कडकपणे राबविल्यानंतर तिथे एकही मृत्यू झालेला नाही.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मायणी मेडिकल हॉस्पिटल, जनसेवा सेंटर म्हसवड ही महत्त्‍वाची सेंटर बंद आहेत. तसेच गावोगावी सुरू झालेली बहुतांशी सेंटर बंद आहेत. त्यामुळे आम्ही म्हसवडकर, चैतन्य गोंदवले बुद्रुक तसेच माणदेशी संचलित गोंदवले खुर्द या सेंटरवर मोठा ताण येत आहे. बहुतांशी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची याच सेंटरना रुग्ण दाखल करण्याची धडपड असते. नाईलाज असेल तरच ते रुग्णांना इतरत्र नेतात. आम्ही म्हसवडकर संचलित म्हसवड येथील सेंटरमध्ये १०० बेड असताना तिथे तब्बल १७४ रुग्ण आहेत. तर दहिवडीत १००- ५४ व नवचैतन्य गोंदवले बुद्रुक येथे १००-७२ असे प्रमाण आहे. समर्पित कोविड आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजन बेडचीही तशीच अवस्था आहे. समर्पित कोविड आरोग्य केंद्र : ऑक्सिजन बेड - दाखल रुग्ण पुढीलप्रमाणे : म्हसवड - १५ - १२, गोंदवले खुर्द - २२ - २५, दहिवडी - ५० - १५, चैतन्य गोंदवले बुद्रुक- ३० - १९, गलांडे हॉस्पिटल म्हसवड - २५ - ३ असे प्रमाण आहे. प्राथमिक उपचार घेणारे ३०० रुग्ण आहेत, तर ७४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

अपवाद वगळता संपूर्ण अनलॉक झाल्यामुळे तसेच सणासुदीचा कालावधी असल्यामुळे गर्दी वाढली आहे. मास्कचा वापर करणे व शारीरिक अंतर ठेवणे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा कल होम आयसोलेशनकडे वाढला आहे. अनेक प्रयत्न करूनही ठराविक ठिकाणच्या रुग्णांना कोरोना सेंटरपर्यंत नेणे प्रशासनाला शक्य होताना दिसत नाही. या सर्व हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोरोना मोठ्या प्रमाणात डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजपर्यंतची माणमधील कोरोनाची स्थिती

  • कोरोनाबाधित रुग्‍ण- १४,९९०

  • बरे झालेले - १३,९९६

  • उपचाराखाली - ६५४

  • मृत्यू - ३४०

  • रॅट टेस्ट - ६५,३०२

  • आरटीपीसीआर - ४३,११६

(मागील सात दिवसांत ७८५४ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी ४४६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT