क-हाड : काळजी घेऊनही 23 ऑगस्टला घरात पहिल्यांदा मला कोरोनाची लागण झाली. माझ्यानंतर घरातील तब्बल 11 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये चार लहान मुलांसह, आई, माझी पत्नी, मुलगी, दोन भाऊ, दोन बहिणी व त्यांच्या मुलांचा समावेश होता. घरात अचानक झालेल्या कोरोनाच्या "एन्ट्री'ने सारे हादरले होते. मात्र, सकस आहार, सकारात्मक मानसिकता अन् सात्विक संवाद अशा त्रिसूत्रीने कोरोनावर सहजगत्या मात केल्याचे किरण इनामदार यांनी नमूद केले.
इनामदार म्हणाले, आम्हाला फार त्रास नव्हता. मात्र, आईला वयोमानाने त्रास झाला. तिला त्वरित कृष्णा हॉस्पिटलला दाखल केले. त्यानंतर आम्ही सारेच दहा जण होम आयसोलेट झालो. त्यावेळी डॉ. संजय भागवत यांनी आम्हा सर्वांना तपासून गोळ्या दिल्या. आहाराचे महत्त्व सांगितले. त्याप्रमाणे कोरोनाशी एकत्र मुकाबला केला. आयुर्वेदिक डॉ. शैलेश मालेकर यांनीही आहाराविषयी काही गोष्टी सांगितल्या. त्या कटाक्षाने पाळल्यामुळे अधिक गतीने बरे होण्यास मदत झाली. पहिल्या दिवशी मला ताप आला, चार दिवसांनी चव आणि सोबत वासही गेला. त्यामुळे लगेच टेस्ट केली.
सिंघम है, सिंघम है, साहब हमारा सिंघम है कऱ्हाडामध्ये घोषणा दणाणल्या
त्यावेळी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, मन मात्र निगेटिव्ह झाले. त्यातही सावरत खंबीरपणे कोरोनाशी मुकाबला करण्याचा निर्णय घेतला. आख्खे कुटुंब पॉझिटिव्ह आलेले होते. मात्र, कोणीच डगमगले नाही. आई कृष्णा हॉस्पिटलमध्ये, आम्ही सारेच घरात होतो. त्यावेळी मित्र प्रमोद पाटील ऊर्फ बापू, इंद्रजित तेली, धीरज राऊत, पंकज पावसकर, मनोज काशीद यांनी सातत घरी भेट देऊन लांबून चौकशी केली. आहाराची सोय केली.
आहारात आम्ही शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही बाजूने खाणे ठेवले. गरम पाणी नेहमीच पिले. दिवसातून पाच वेळा वाफारा घेतला. आहारामध्ये चिकन, अंडी, मटण, त्याचे सूफ, ड्रायफ्रूट, बदाम असा सकस आहार ठेवला. तो सगळ्यांना सक्तीने घ्यायला लावला.
विनावाहक बस उत्पन्नात दीड लाखांची घट; सातारा आगाराला फटका
त्या काळात सगळ्यांचेच मोबाईल बंद केले. सगळ्यात आधी मोबाईलमधील व्हॉट्सऍप डिलीट केले. सकारात्मक मानिसकता ठेवली. सातत्याने सकारात्मक विचारांची चर्चा केली. अखेर 14 दिवसांनी सारेच कुटुंब एकाच दिवशी कोरोनामुक्त झाले. आईलाही बरे वाटू लागल्याने व कोरोनामुक्त झाल्याने दवाखान्यातून घरी सोडण्यात आले.
मानसिकता सकारात्मक हवी, कोरोना तुमचे काहाही बिघडवू शकत नाही, हेच सत्य मानून सकारात्मक विचार, सकस आहार, सात्विक चर्चा या त्रिसूत्रीने आम्ही कोरोनावर सहजगत्या मात केली.
...अशी घेतली काळजी
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.