सातारा

भय इथलं संपेना, कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने अडीचशेचा टप्पा ओलांडला

प्रवीण जाधव

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांपैकी 11 जणांचा मंगळवारी (ता.17) मृत्यू झाला. बाधित मृतांच्या आकड्याने अडीचशेचा टप्पा ओलांडल्याने भय इथलं संपेना अशी जिल्ह्यातील स्थिती कायम आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 392 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दिवसात 226 नागरिकांना घरी सोडण्यात आले, तर 743 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले.
 
जिल्ह्यातील 11 जणांचा काल रात्रीपासून कोरोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये सरताळेतील (ता. जावळी) 56 वर्षीय महिला, बुधवार पेठेतील (कऱ्हाड) 48 वर्षीय महिला, गोडोलीमधील (सातारा) 72 वर्षीय पुरुष, नेले (ता. सातारा) येथील 75 वर्षीय महिला, फलटणमधील 60 वर्षीय महिला व राजेवाडी-निगडीतील (ता. सातारा) 70 वर्षीय पुरुष. आंबेडकरनगरातील (पाटण) 69 वर्षीय पुरुष, महाबळेश्वरमधील 80 वर्षीय पुरुष व 51 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील (सातारा) 76 वर्षीय पुरुष व गिगेवाडी (ता. कोरेगाव) येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 260 झाला आहे. दरम्यान, आज रात्री आलेल्या अहवालात 392 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांविषयी तपशील समजू शकला नाही. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8321 झाली आहे, तर 4,449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

म्हसवडला नियोजित औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारण्यास अनेकजण इच्छुक
 
दरम्यान, काल रात्रीच्या अहवालानुसार तब्बल 290 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. या बाधितांची तालुका व गावनिहाय संख्या- फलटण ः फलटण शहर- 4, मलटण- 1, मांडवखडक- 1, विडणी- 2, लक्ष्मीनगर- 2, मंगळवार पेठ- 1, कोळकी- 1, मारवाड पेठ- 3, तरडगाव- 1, ठकुबाची वाडी- 1, तावडी- 1, कसबा पेठ- 1, तामखाडा- 4, जिंती- 1, निंबोरे- 1, खेड बुद्रुक- 1, बिरदेवनगर- 1, गिरवी- 1. वाई ः गंगापुरी- 1, कवठे- 1, रविवार पेठ- 2, उडतारे- 2, पांढऱ्याचीवाडी- 1, बावधन- 12, पाचवड- 1, शेंदूरजणे- 2, धोम कॉलनी- 1, ओझर्डे- कदमवाडी- 1, ब्राह्मणशाही- 2. सातारा ः दौलतनगर- 1, कामाठीपुरा- 1, नेले किडगाव- 1, सातारा शहर- 2, भवानी पेठ- 1, शाहूनगर- 2, खेड- 1, पोलिस लाईन- 1, दरे ब्रुद्रुक- 1, तामजाईनगर- 1, वाहतूक पोलिस- 1, वडोली- 1, विलासपूर- 1, शनिवार पेठ- 1, वडगाव- 1, गुरुवार पेठ- 1, अतीत- 15, वाढे- 5, विकासनगर- 1, वळसे- 1, नांदगाव- 2, मल्हारनगर- 1, केसरकर पेठ- 1, सोमवार पेठ- 1, शिवथर- 1, गोडोली- 1

कर्मचारी जीवावर उदार, करताहेत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार!

देशमुख कॉलनी- 1, राजेसपुरा पेठ- 1. कऱ्हाड ः सैदापूर- 4, रेठरे कारखाना- 1, कऱ्हाड शहर- 16, मलकापूर- 11, तासवडे- 1, आगाशिवनगर- 3, वाठार- 1, सोमवार पेठ- 6, नांदलापूर- 1, गोटे- 3, शनिवार पेठ- 5, आटके- 1, मंगळवार पेठ- 6, वडगाव- 1, काले- 1, एचडीएफसी बॅंक- 7, विरवडे- 1, उंब्रज- 1, तळबीड- 2, चरेगाव- 1, शिवडे- 1, गोवारे- 1, मालखेड- 1, रविवार पेठ- 4, रुक्‍मिणीनगर- 2, बुधवार पेठ- 6, शुक्रवार पेठ- 2, मसूर- 1, चोरे- 6, कऱ्हाड शहर पोलिस- 2, वाघोरी- 4, साळशिरंबे- 1, धोंडेवाडी- 1, कापील- 1, साकुर्डी- 2, सह्याद्री हॉस्पिटल- 1, कार्वे- 1, कालिदास मार्केट- 1, कोणेगाव- 1, रविवार पेठ- 1, गुरुवार पेठ- 1, वाकन रोड- 3, टाळगाव- 1, गोळेश्वर- 1, बाबरमाची- 1. पाटण ः कालगाव- 2, पाटण- 4, पंचमोरगिरी- 1, सांघवड- 2, दिवशी बुद्रुक- 1, दौलतनगर- 1. महाबळेश्वर ः बाह (पाचगणी)- 1. कोरेगाव ः कोरेगाव शहर- 1, विखळे- 1, नायगाव- 1, तहसील ऑफिस- 1, रहिमतपूर- 1. खटाव ः विसापूर- 1, मोराळे- 3, वडूज- 1, वांजोळी- 5, खटाव- 1, तडवळे- 2, उंबर्डे- 1, मायणी- 1, राजाचे कुर्ले- 1. माण ः म्हसवड- 3, मासाईवाडी- 1. जावळी ः सरताळे- 1, मेढा- 2, गांजे- 1, मोरघर- 12. 

पालकमंत्र्यांवर ब्रीच कॅन्डीत उपचार सुरू 

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मंगळवारी सकाळी उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले. त्या वेळी त्यांनी चित्रफितीद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. माझी तब्येत व्यवस्थित आहे. लोकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, ग्लोज वापरणे, मास्क वापरणे व स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. कोरोनावर सध्या हेच उत्तर आहे. उपचार घेऊन लवकरच मी बरा होऊन परत आपल्या सेवेत येईन, असे त्यांनी या चित्रफितीत म्हटले आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT