सातारा

डोळ्यात तेल घालून राखण केलेल्यांचे अश्रू ओघळले, नेमके काय झाले डिस्कळमध्ये वाचा

केशव कचरे

बुध (जि.सातारा) :  डिस्कळ (ता. खटाव) येथील 60 व 40 वर्षीय अशा दोन व्यक्ती कोरोना बाधित सापडल्याने डिस्कळसह उत्तर खटाव परिसर पूरता हादरून गेला आहे. गेले तीन महिने सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, दक्षता समिती, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील तरुणांनी डोळ्यात तेल घालून कोरोनापासून गावाची राखण केली.
...तर कणकवलीसारखी परिस्थिती होण्याची भीती
 
बाहेरगावाहून येणाऱ्यांना क्वारंटाइन करून गाव कोरोनापासून मुक्त राहावे, यासाठी नियमांचे पालन केले. शेजारील मांजरवाडी, गारवडी, चिंचणी, विठ्ठलवाडी येथे रुग्ण सापडले. मात्र, मोठ्या लोकसंख्येचे गाव असूनही डिस्कळमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता. आज गावातील दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डिस्कळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे येथील एका नातेवाइकाच्या लग्नासाठी डिस्कळ येथील एकाच कुटुंबातील चार ते पाच जण 30 जून रोजी सकाळी पुण्याला गेले होते. लग्नविधी उरकून सायंकाळी डिस्कळ येथील घरी परत आले. मात्र, त्यांना क्वारंटाइन करण्यात आले नव्हते. दरम्यान, 14 जुलै रोजी त्या कुटुंबातील 60 व 40 वर्षीय व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्याने त्या दोघांना मायणी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

'मैं कैसा बाप हुँ, अपने बच्ची के दुध का भी खर्चा नहीं उठा सकता', अस म्हणत तो मुलीला घेऊन घराबाहेर पडला अन्‌... 

आज (शुक्रवारी) सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत त्या कुटुंबातील निकट सहवासित 13 व्यक्तींना हायरिस्क म्हणून पुसेगाव येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. याशिवाय आणखी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, आज सकाळी डिस्कळ येथे गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. पवार, डॉ. रणदिवे, मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी गावाची पाहणी करून गाव कंटेनमेंट झोन जाहीर केले. संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करून गावाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून, गाव 14 दिवस लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, दक्षता समितीचे सदस्य यांची 20 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे गावातील कुटुंबांचा आरोग्य सर्व्हे करण्यात येत आहे.
संपादन - सिद्धार्थ लाटकर

देशातील एवढ्या विद्यापिठांमध्ये परिक्षा घेण्याची तयारी सुरू! 'युजीसी'ने सांगितली आकडेवारी

एनडीआरएफचे पथक 'या' शहरात दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT