सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय योजनेतून सेवा पुरवत कोरोना योद्ध्यांची भूमिका जिल्ह्यातील काही खासगी हॉस्पिटल्स बजावत आहेत. कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या हॉस्पिटल्सनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी प्रशासन व नागरिकांकडूनही त्यांना सहकार्य होणे आवश्यक आहे.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय दवाखान्यांची यंत्रणा त्यामुळे तोकडी पडत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा व बेड उपलब्ध होण्यासाठी शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये कोरोनावरील उपचाराचा समावेश केला आहे. कोरोनाबाधितांवर शासकीय योजनेत उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश हॉस्पिटल तयार नाहीत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील एकूण 27 पैकी केवळ दहा रुग्णालयांमध्येच योजनेच्या दरपत्रकानुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, या रुग्णालयांनाही विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
साहेब, चला पटकन, दंगल भडकली अन् वाचा पुढे काय झाले
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या रुग्णालयांना आवश्यक असणारा नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफ अपुरा पडत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक जण कामावर येणे टाळत आहेत. घरातून व शेजारच्या नागरिकांकडून बाधेच्या भीतीने होणारा विरोध त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. परंतु, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व शेजाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी येते. त्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी सपोर्ट करणे आवश्यक आहे. नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफला भेडसावणाऱ्या समस्या सोडवून प्रशासनानेही असे सर्व कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत कामावर हजर राहतील, याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
मोर्चा निघणार तेवढ्यात राजू शेट्टींना पोलिसांनी अडविले, मग काय घडले वाचा
कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु, मागणी वाढल्याने अनेकदा ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. तसेच त्याची दरवाढही झाली आहे. त्यामुळे रुग्णांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठीही प्रशासनाने पुरेशी यंत्रणा तातडीने उभारण्याची गरज आहे. कोरोनावर योजनेंतर्गत उपचार करणाऱ्या हॉस्पिटलकडे बेड क्षमतेच्या साधारण दहा टक्केच व्हेंटिलेटर्स आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व इतर प्रशिक्षित यंत्रणा असूनही व्हेंटिलेटरअभावी रुग्णांना सुविधा देता येत नाहीत. कोरोनाबाधित रुग्णांवर रेमडिसिव्हर हे औषध प्रभावी ठरते.
साताऱ्यात खासगी रुग्णालयांचा कोरोनाबाधितांवर उपचारास नकार; प्रशासन ढिम्म
बाजारामध्ये या औषधांचा तुटवडा आहे. तसेच जादा किंमत मोजावी लागते. वेळेवर ती इंजेक्शन उपलब्धही होत नाहीत. परिणामी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शासकीय योजनेत सहभागी असणाऱ्या खासगी रुग्णालयांसाठीही जिल्हा रुग्णालयामार्फतच या इंजेक्शनची खरेदी होऊन ती पुरविली जाणे आवश्यक आहे. कोरोनाबाधितांवर उपचारामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या अडचणींचा आढावा घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना होणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालावे, अशी हॉस्पिटल चालकांची अपेक्षा आहे.
सावधान! तुमची देखील अशी हाेऊ शकते फसगत; आगाशिवनगरमधून 67 हजार लुटले
सहकार्याची गरज
बाधित आल्यानंतर रुग्णालयात दाखल होईपर्यंत अनेक जण अनेक मार्गाने प्रयत्न करतात. परंतु, दाखल झाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाशी अनेकांकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. रुग्णाचा योजनेत सहभाग करून घेण्यासाठी कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नाहीत. रुग्णासोबत एकही नातेवाईक उपलब्ध नसतो. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीची वेळावेळी योग्य माहिती समजून घेतली जात नाही. काही नातेवाईक तर, दाखल केल्यानंतर निघून गेल्याचे व फोनवरही संपर्क ठेवत नसल्याचे समोर आले आहे. त्यातून डिस्चार्ज घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या उपचारात योगदान देणाऱ्या रुग्णालय व्यवस्थापनाशी नागरिकांनीही सौहार्दाने वागणे आवश्यक आहे.
पृथ्वीराजबाबांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही
गरज नसतानाही अडताहेत बेड
खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या अनेकांना कोणतीही गंभीर लक्षणे नसतात. घरी राहूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासारखी असते. परंतु, शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये जाण्याची मानसिकता नसल्याने प्रकृती ठिक असल्याचे सांगूनही अनेकजण डिस्चार्ज घेत नाहीत. दहा ते 14 दिवस ते रुग्णालयात राहण्याचा हट्ट करतात. त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. रुग्ण व नातेवाईकांनी गंभीर रुग्णासाठी बेड उपलब्ध होण्यासाठी सहयोग दाखविणे गरजेचे असल्याचे मत मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉ. विकास पाटील व डॉ. जयदीप चव्हाण यांनी सांगितले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.