crime police action on gang who robb elderly and 21 tola gold seized satara esakal
सातारा

Satara Crime : वृद्धांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पकडल

२१ तोळे सोने जप्त; शाहूपुरी पोलिसांची धुळ्यात सापळा लावून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सातारा : वृद्धांना आमिष दाखवून गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल २१ तोळ्याचे दागिने आणि अन्य साहित्य असा सुमारे १२ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

विकी राम साळुंखे (वय २२, रा. समतानगर, साक्री रोड धुळे, जि. धुळे) व विजय सुभाष नवले (वय ३९, रा. वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. शहरातील जुना मोटार स्टॅण्ड परिसरात १२ फेब्रुवारीला एका वृद्ध महिलेस अनोळखी व्यक्तींनी अडवले. शेठला खूप वर्षांनी मुलगा झाला असून, तो साडी, धान्यवाटप करीत आहे, असे आमिष दाखवून त्यांच्या गळ्यातील दागिने काढण्यास सांगून ते लंपास केले होते.

गुन्हा दाखल झाल्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. त्यांनी घटना घडलेल्या ठिकाणापासून शहर व टोलनाक्यापर्यंतचे ५४ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये संशयित दुचाकीवरून जात असल्याचे समोर आले. त्या आधारे पोलिस संशयितापर्यंत पोचले. त्यांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी एक पथक तयार करून धुळे येथे पाठवले, तसेच त्यांच्या घराजवळ साध्या वेशात सापळा लावून चार दिवस हालचालीवर लक्ष ठेवले.

त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन साताऱ्यात आणण्यात आले. चोरी केलेले सोने या चोरट्यांनी नीरा येथील ज्वेलर्सच्या दुकानात विकले होते. पोलिसांनी त्या सराफाकडून चोरीचे ११ लाखांचे २१ तोळे सोने, दोन दुचाकी, मोबाईल जप्त केले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक गणेश किंद्रे, निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार लैलेश फडतरे, हसन तडवी, अमित माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्नील पवार, स्वप्नील सावंत हे या कारवाईत सहभागी होते.

अन्य तिघे फरारी

चौकशीमध्ये त्यांनी सातारा, कोरेगावसह, सांगली, कोल्हापूर, मुंबई, फलटण, नंदूरबार, नगर शहरामध्ये अशाच प्रकारे वृद्धांना लुबाडल्याचे समोर आले. त्यांच्या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश आहे. संबंधित तिघेही फरारी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT