रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : रेठरे बुद्रुकचा विकास संतगतीने सुरू आहे. एका पंचवार्षिकचा अपवाद वगळता आजतागायत ग्रामपंचायतीवर (कै.) जयवंतराव भोसले गटाचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, याच एकहाती सत्तेची सूत्रे हलवताना भोसले गटाचे नेते तितके जोमाने कार्यरत नसल्याचे दिसते आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रभागनुसार सभा आणि बैठका आटोपून गेलेले नेते पुन्हा गावाकडे फिरकलेले नाहीत. परिणामी, विकासकामे व सुविधा देताना सरपंचांसह सदस्यांची दमछाक होत आहे. नेत्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विसंवाद आहे. त्यामुळे गावगाडा अक्षरशः रुतून बसला आहे. या गाड्यास नेते स्टार्टर कधी मारणार? याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून रेठरे बुद्रुक हे गाव परिचित आहे. यशवंतराव मोहिते विरुद्ध जयवंतराव भोसले या पारंपरिक गटामध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली आहे. एकवेळेस मोहिते गटास बबनराव दमामे सरपंच असताना सत्ता मिळाली. तेव्हापासून भोसले गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. गत निवडणूक मोहिते- भोसले विरुद्ध "कृष्णा'चे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते गटामध्ये लढली गेली. निवडणुकीत सत्ताधारी मोहिते व भोसले गटाने एकहाती बाजी मारली. त्या निवडणुकीत भोसले गटाचे नेते डॉ. सुरेश भोसले व अतुल भोसले यांनी प्रभागनिहाय बैठका घेतल्या. निवडणुकीत आश्वासनाची अक्षरशः खैरात झाली.
याला म्हणायचं विश्वास! तहसीलदार, डीवायएसपीची मुले शिकणार सरकारी शाळेत
निवडणुकीनंतर अडीच वर्षांचा कालावधी झाला, तरी नेते पुन्हा गावाकडे फिरकलेले नाहीत. लोकनियुक्त सरपंच सुवर्णा कापूरकर यांच्या अधिपत्याखाली आजअखेर 14 व्या वित्त आयोगातून जवळपास एक कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आमदार निधीतील एक काम वगळता इतर कोणत्याही निधीमधून विकासकामे आलेली नाहीत. गावचा विस्तार खारे फाटा, तावरे वस्ती, पवार मळी, घोडके मळी, डगरा पाणंद, कारखाना रोड, सावंत अळी, कॅनॉल वस्ती या सहा किलोमीटरच्या परिघात लोकवस्ती विस्तारली आहे. शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना प्रभावीपणे राबली आहे. 14 व्या वित्त आयोगा व्यतिरिक्त दुसरा कोणताही निधी आलेला नाही. गावामध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. नेत्यांच्या दुर्लक्षामुळे गावगाडा रुतला आहे. भोसले पिता-पुत्र नेत्यांनी गावची आढावा बैठक घेण्याची गरज आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील रायगावात भुयारी मार्गाखाली पाणीच पाणी; प्रवाशांसह ग्रामस्थ त्रस्त
"कृष्णा'कडे सव्वाकोटीचा निधी रखडला
गावच्या कार्यक्षेत्रात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याची कर आकारणी ग्रामपंचायतीस ठोक अंशदान रूपात मिळते. हे अनुदान गेल्या दहा वर्षांपासून थकित आहे. जवळपास सव्वाकोटी रुपयांचा हा निधी रखडला आहे.
पोलिस महानिरीक्षकांकडून लाचखोरांमुळे वरिष्ठांवर लवकरचं होणार कारवाई ?
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.