Cyclone Tauktae esakal
सातारा

माण तालुक्‍यात चक्रीवादळाचा फळबागांना मोठा तडाखा

नागरिकांना कोरोनाबरोबरच तौत्के चक्रीवादळाचाही सामना करावा लागत आहे.

विशाल गुंजवटे

बिजवडी : नागरिकांना कोरोनाबरोबरच तौत्के चक्रीवादळाचाही (Cyclone Tauktae) सामना करावा लागत आहे. माण तालुक्‍यातील (Maan Taluka) डाळिंब फळबागांनाही त्याचा मोठा फटका बसला असून बहार धरलेल्या फळबागांच्या (Fruit Orchards) निघत असलेल्या कळ्या, फुले गळून, तर सेटिंग झालेली फळे तुटून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Damage To Fruit Orchards In Maan Taluka Due To Cyclone Tauktae Satara Marathi News)

माण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंब फळबागा लावल्या होत्या. मात्र, तेल्या व मर रोगामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी फळबागा काढून टाकल्या. मात्र, पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच डाळिंब, आंबा, सीताफळ, संत्रा, पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र लागवडीखाली आणले. बहुतांश ठिकाणी डाळिंबाचे बहार धरण्यात आले असून काहींच्या बागा सेट झाल्या आहेत, तर काहींच्या कळ्या, सेटिंग अवस्थेत आहेत. मात्र, चक्रीवादळामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले. सेटिंग झालेली फळे तटून पडली, तर कळ्या, फुले गळून पडल्या. त्यामुळे फळबाग उत्पादनात मोठा फरक पडणार आहे. वादळी वाऱ्यासह अधूनमधून येणाऱ्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर रोगराईलाही निमंत्रण मिळणार आहे.

डाळिंबीच्या झाडांना मोठ्या प्रमाणात कळ्या व फुले निघाली होती. काही फळांचे सेटिंगही चालू होते. मात्र, या चक्रीवादळामुळे कळ्या, फुले गळून पडली, तर सेटिंग झालेली फळे तुटून पडली. आता पुन्हा फळबागेला फळे तयार होण्यासाठी अडचणी येणार असल्याने मोठे नुकसान होणार आहे.

-मारुती डांगे, तोंडले

उन्हाळ्यात बागा धरल्या की नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व वातावरणातल्या थंडाव्याने उष्णतेची जाणीव झाली नाही. मात्र, चक्रीवादळाने बहर धरलेल्या बागांचे मोठे नुकसान केले.

-धनश्री शिंदे, बिजवडी

साहेब.. सगळं काही उद्ध्वस्त झालं, आता तुम्हीच काहीतरी करा; शेतकऱ्यांची खासदारांना आर्त साद

Damage To Fruit Orchards In Maan Taluka Due To Cyclone Tauktae Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT