Drone Camera esakal
सातारा

Drone Camera : दिवसा फिरणारे ड्रोन कॅमेरे पाणी सर्वेक्षणाचे..! रात्री फिरणारे ड्रोन मात्र वेगळेच

माण तालुक्याच्या उत्तरेकडील बिजवडी, मोगराळे, पाचवड, तोंडले तसेच फलटण तालुक्यातील धुमाळवाडी, गिरवी परिसरात गेले काही दिवस रात्रीचे ड्रोन कॅमेरे आकाशात घिरट्या घालत होते.

विशाल गुंजवटे

बिजवडी - माण तालुक्याच्या उत्तरेकडील बिजवडी, मोगराळे, पाचवड, तोंडले तसेच फलटण तालुक्यातील धुमाळवाडी, गिरवी परिसरात गेले काही दिवस रात्रीचे ड्रोन कॅमेरे आकाशात घिरट्या घालत होते. काही दिवसांनंतर पुन्हा या परिसरात दिवसा ड्रोन कॅमेरे घिरट्या घालू लागले आहेत. मात्र, हे ड्रोन कॅमेरे माणच्या उत्तरेकडील वंचित गावांना जिहे-कठापूरचे पाणी कसे अन्‌ कोठून द्यायचे? याचे सर्वेक्षण करणारे असल्‍याची माहिती मिळत आहे.

गुरुवर्य (कै.) लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) या योजनेत उत्तर माण व पश्चिम माणमधील वंचित गावांचा समावेश करून त्यांना सव्वा टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या गावांना पाणी कसे द्यायचे, याचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी बिजवडी व परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे सर्वेक्षण सुरू आहे.

मात्र, काही दिवसांपासून रात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांनी नागरिकांत दहशत निर्माण केली असतानाच पुन्हा दिवसा ड्रोन दिसू लागल्याने नागरिकांतून विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या. ड्रोनच्या दिशेने गेल्यानंतर समजले की ते ड्रोन पाणी सर्वेक्षणाचे आहेत.

संबंधितांकडे याबाबत चौकशी केल्यानंतर जे ड्रोन कॅमेरे चालवत आहेत, ते बिजवडीत राहत असून, ते पाणी सर्वेक्षणाचे काम करत आहेत, असे सांगण्यात आले. त्यांच्याकडे यासंदर्भात अधिकची चौकशी केली असता ते म्हणाले, की आमचे जिहे-कठापूर योजनेचे पाणी सर्वेक्षणाचे काम आहे.

आम्हाला फक्त दिवसाच ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पाहणी करण्याची परवानगी आहे. आम्ही रात्री पाहणी करत नाही. त्यामुळे दिवसा फिरणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्याबाबत पसरल्‍या जाणाऱ्या अफवांवर विश्‍‍वास ठेऊ नये, असेही सांगण्‍यात आले. मात्र, रात्री फिरणारे ड्रोन का घिरट्या घालताहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे.

रात्रीच्‍यावेळी आकाशात फिरणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांनी झोप उडवली होती अन्‌ आज जाधववाडी व बिजवडीत दिवसाच आकाशातून ड्रोन कॅमेरे फिरताना दिसले. आम्ही त्या दिशेने जाऊन त्याचा तपास केला. तेव्हा ते ड्रोन कॅमेरे पाणी सर्वेक्षणाचे आहेत, अशी माहिती मिळाली.

- शंकर जाधव, संचालक, बिजवडी विकास सेवा सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Washim Assembly election: उमेदवारी नाकारल्याने आमदार मलिक यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्यांना बोलून भूमिका घेणार असल्याचा इशारा

चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Ulhasnagar Assembly Elections 2024: पुन्हा 'कलानी' विरुद्ध 'आयलानी' आमनासामना

Virender Sehwag: 'संघात फक्त सेहवागचीच मनमानी होती, त्याने मला...', मॅक्सवेलने पंजाब किंग्स संघातील वातावरणाची केली पोलखोल

SCROLL FOR NEXT