Satara Crime Sakal
सातारा

Satara Crime : कऱ्हाडातून १७ दुचाकी चोरणाऱ्या कागलच्या चोरट्यास अटक; डीबी पथकाची कारवाई

पोलिसांना जप्त केला १५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : शहर परिसरातून नव्या दुचाकी चोरणाऱ्या संसयीतास पोलिसांनी शिताफीने एठक केली. त्याच्याकडून तब्बल १५ लाख ३० हजरांच्या १७ दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रकाश निंबाळकर (वय ४५, रा. मौजे सांगाव ता. कागल जि. कोल्हापुर) असे संशयीताचे नाव आहे. तो सराईत संशयीत अशल्याचे पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले.

शहर पोलिस ठाण्याच्या डीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत शहर परिसरातून चोरलेल्या १३ तर पेठवडगावच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकी जप्त आहेत. निंबालकर पोलिस रेकॉर्डवरील संशयीत आहे.

त्याच्यावर यापूर्वी २००९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर तो पुन्हा सक्रीय झाला, मात्र त्याने कोल्हापूर जिल्हा सोडून चोऱ्या करण्यास सुरूवात केली होती. मात्र तो येथील पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती संशयीतरित्या शहर व परिसरात फिरत आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक के. एन. पाटील व डीबीचे फोजदार पंतग पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारातर्फे मिळाली. फौजदार पाटील यांनी त्याची खात्री केली. ती माहिती खरी अशल्याने त्याच्यावर वॉच ठेवला.

त्यानंतर बीट मार्सल पोलिसांच्या पथकाच्या मदतीने डीबीच्या कर्मचाऱ्यांनवी त्यालाताब्यात घेतले. त्यावेळी तो उडवा उडवीची उत्तेर देत होता. पोलिस तपासात त्याचे नाव प्रकाश निंबाळकर अशल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने एक, दोन नव्हे तब्बल १७ दुचाकी चोरीची कबुली देताच पोलिसही चक्रावले.

निंबाळकरकडे पोलिसांनी कसून चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी डीबी पथकाला त्याच्याकडून १५ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात यश आले. चोरीच्या दुचाकींच्या तपासाबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल छडा लावण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकुर यांनी तपासाच्या सुचना केल्या त्यात उपनगरात होणाऱ्या दुचाकी चोऱ्यांचा आढावा घेतला. त्याबाबत पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डीबीचे फौजरा पंतग पाटील यांच्या पथकाने तपास केला. त्यात सहायक फौजदार रघुवीर देसाई, नागनाथ भरते, हलदार शशिकांत काळे,

अमित पवार, बाळासाहेब जगदाळे, अशोक वाडकर, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील यांनी तपासात भाग घेतला. डीबीने आखलेल्या सापळ्यात निंबळकर अडकला. त्याच्याकडून शिताफीने १५ लाख ३० हजारांच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला आगाशिवनगर परिसरात बीट मार्शलच्या पथकाने अटक केली.

आर्थिक अडचणीमुळे चोरीकडे वळाला

संशयित निंबळकर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील संसयीत आहे. त्याच्यावर २००९ मध्ये काही गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती पोलिसघेत आहेत. त्यानंतर त्याने चोरी करण्याचे सोडून खासरी नोकरी धरली होती. मात्र पुन्हा तो आर्थिक अडचणीत आला. त्याला पैशांची गरज होती,

म्हणून त्याने कोल्हापूर जिल्ह्याबाहेर दुचाकी चोऱ्यांच्या उद्दोयग सुरू केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुडे आली आहे. त्याने कऱ्हाडमधील १३ दुचाकी चोरल्या त्या सगळ्या नविन दुचाकी आहेत. त्या १० ते १५ हजाराप्रमाणे कोल्हापूर भागात विकल्या आहेत. त्या दुचाकी प्रामुख्याने शेतातील विविध कामासाठी वापरल्याचेही पोलिसाच्या तपासात पुढे आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT