उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खटावात येऊन घोषणा केलेला उमेदवार पडतोय, याची मोठी खंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लागून राहिलीय.
निमसोड : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत खटाव सोसायटी (Khatav Society) मतदारसंघातून तालुक्याचा स्वाभिमान जोपासत माजी आमदार प्रभाकर घार्गे (Prabhakar Gharge) चौथ्यांदा निर्विवाद विजयी होऊनही कोल्हापूरच्या तुरुंगात अडकून पडले आहेत, तर राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक दिग्गज नेत्यांसोबत औंधसह बारामतीच्या दादांनी दिलेला उमेदवार नंदकुमार मोरे (Nandkumar More) पराभूत झाल्याने सत्तेच्या गुलालात येऊनही घरात बसावे लागले. औंधला सन्नाटा तर पळशी, निमसोड, मायणीसह तालुक्यात जल्लोष दिसून आला.
'लक्ष्मी'वासला नाकारत मतदार घार्गेंसोबत ठाम राहिले, तर घार्गे कुटुंबीय, देशमुख, येळगावकर व भक्कम निष्ठावंत कार्यकर्ते विजयाचे खरे शिल्पकार ठरले. निमसोडमध्ये पारंपरिक विरोधक असलेले मोरे-देशमुख रणसंग्रामात सलग दोनवेळा ग्रामपंचायत निवडणुकीत, तर आता जिल्हा बँकेतही मोरे यांना धूळ चारल्याने कॉंग्रेस नेते रणजितसिंह देशमुख समर्थकांनी गुलालासह जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खटावमध्ये येऊन घोषणा केलेला उमेदवार पडतोय, याची फार मोठी खंत खटावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लागून राहिलीय. पराभव हा फक्त निमसोडच्या मोरेंचा नसून औंध, लोधावडेसह बारामतीचा झाला आहे. त्यामुळं आगामी वडूज नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील नवीन राजकीय धृवीकरण आगामी काळात निश्चित दिशादर्शक ठरणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.