नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही मृतदेह सापडला नाही.
सातारा : उरमोडी धरणामध्ये (Urmodi Dam) काल बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह आज सकाळी आढळून आले. सौरव सुनील चौधरी (वय २२) व आकाश रामचंद्र साठे (वय २०, दोघे रा. सदर बझार) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे काल सायंकाळी दुचाकीवरून उरमोडी धरणावर पोहण्यासाठी गेले होते.
सायळी गावाच्या हद्दीत झुडपातील रस्त्यातून त्यांनी धरणपात्रात प्रवेश केला. तेथे अन्य कोणी नव्हते. मात्र, ते पोहत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. त्यावेळी युवकांनी ठेवलेली कपडे व मोबाईल त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी सौरवचा मोबाईल सतत वाजत होता. त्यांनी फोन उचलून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मोबाईल उरमोडी धरण परिसरात असल्याची माहिती दिली.
हे ऐकून सौरवची आई घाबरली व तिने आरडाओरडा करत कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सौरवचा मोठा भाऊ गौरव व काही मित्र घटनास्थळी गेले. त्यांनी परिसरात पाहणी केली. मात्र, कोणी आढळून आले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यांनी याबाबत शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थ, कातकरी समाजातील काही व्यक्ती व कुटुंबीयांनी सकाळी शोधमोहीम सुरू केली.
नऊच्या दरम्यान रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही मृतदेह सापडला नाही. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनीही स्वतः बोटीत चढून शोध घेतला. नंतर बाराच्या सुमारास अंबवडे येथील काही युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तो आकाशचा होता. त्यानंतर सातारा येथील काही कातकरी व्यक्ती तसेच कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरूच ठेवली होती. या वेळी पाऊसही पडत होता. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दुसरा मृतदेह शोधून काढण्यास यश आले. याबाबात तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.